आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटर दीपक चहर 1 जूनला करणार लग्न:दिल्लीच्या जया भारद्वाजसोबत आग्रामध्ये घेणार 7 फेऱ्या, बहिणीने घडवून आणली होती दोघांची भेट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज दीपक चहर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 1 जून रोजी तो त्याची मंगेतर जया भारद्वाजसोबत आग्रा येथे 7 फेऱ्या घेणार आहे. त्यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. दीपकने गेल्या वर्षी दुबईत IPL सामन्यादरम्यान गर्लफ्रेंड जया हिला अंगठी घालून प्रपोज केले होते. यावर जयाने हो म्हटलं होतं. दीपकच्या बहीणीने या दोघांची भेट घडवून आणली होती.

दीपक आणि जयाच्या लग्नाचे हे कार्ड त्यांच्या कुटुंबीयांनी दिव्यमराठी रिपोर्टरला पाठवले आहे.
दीपक आणि जयाच्या लग्नाचे हे कार्ड त्यांच्या कुटुंबीयांनी दिव्यमराठी रिपोर्टरला पाठवले आहे.

सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि पंजाबचा कर्णधार केएल राहुल यांनी टाळ्या वाजवून दीपकचे अभिनंदन केले.

दीपकला CSK ने 14 कोटींना घेतले विकत

यावेळी IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्याला 14 कोटी रुपयांना खरेदी केले. मात्र दुखापतीमुळे तो IPL मधून बाहेर पडला होता. फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या T20 मालिकेदरम्यान 29 वर्षीय खेळाडूला दुखापत झाली होती.

जयाचा भाऊ सिद्धार्थ आहे बिग बॉस 5 फेम

दीपक चहर आणि जया भारद्वाज यांची भेट दीपकची बहीण मालती हिने करवून दिली होती. दीपकची बहीण मालती चहर एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. दीपकने जया यांची त्याच्या संपूर्ण कुटुंबाशी ओळख करून दिली आणि नाते निश्चित झाले. जया मूळची बाराखंबा, दिल्लीची आहे. त्यांच्या पश्चात आई आणि भाऊ सिद्धार्थ असा परिवार आहे. सिद्धार्थ बिग बॉस 5 मध्ये आला आहे. याशिवाय तो MTV च्या प्रसिद्ध शो स्प्लिट्स व्हिलामध्येही दिसला आहे.

बहीण मालतीने दीपकची जयाशी पहिल्यांदा ओळख करून दिली. यानंतर त्यांच्या नाते पुढे गेले
बहीण मालतीने दीपकची जयाशी पहिल्यांदा ओळख करून दिली. यानंतर त्यांच्या नाते पुढे गेले

जया लहान असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. जयाच्या आईने होर्डिंग डिझाइनचा व्यवसाय सांभाळला आणि दोन्ही मुलांचे संगोपन केले. एमबीए केल्यानंतर जया दिल्लीतील एका टेलिकॉम कंपनीत डिजिटल प्लॅटफॉर्म प्रमुख आहे.

बातम्या आणखी आहेत...