आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • Chennai Lost 3 Matches In A Row For The First Time In The Opener, Punjab Kings Defeated Chennai Super Kings By 60 Runs.|Marathi News

IPLचा अकरावा सामना:गत चॅम्पियन चेन्नईने सलामीचे प्रथमच सलग 3 सामने गमावले, पंजाब किंग्जने चेन्नई सुपरकिंग्जला 60 धावांनी पराभूत केले

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरला. पंजाब किंग्जविरुद्ध चेन्नईला ५४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हा चेन्नईचा दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला. यापूर्वी, मुंबईने २०१३ मध्ये त्यांना ६० धावांनी हरवले हाेते. प्रथम खेळताना पंजाबने ८ बाद १८० धावांचा डोंगर उभारला. लिव्हिंगस्टोनने ६० धावा, शिखर धवनने ३३ व जितेश शर्माने २६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात चेन्नईचा डाव १८ षटकांत १२६ धावांवर ढेपाळला. चेन्नई संघ पाचव्यांदा सर्वबाद झाला. शिवम दुबेने सर्वाधिक ५७ धावा काढल्या. कर्णधार जडेजा शून्यावर बाद झाला. चेन्नईने पॉवर प्लेमध्ये ४ गडी गमावले. राहुल चाहरने ३, लिव्हिंगस्टोनने २ व वैभव अरोराने २ गडी बाद केले.

चेन्नईला युवा खेळाडूंची गरज, वरिष्ठ अपयशी
चेन्नई पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याचे कारण फलंदाजी आहे. संघातील काही वरिष्ठ खेळाडू आहेत, ज्यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे. त्याचबरोबर फलंदाजीची योजना नाही, खेळाडू मैदानावर टिकून राहण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. संघाला युवा खेळाडूंची आवश्यकता आहे. ऋतुराज गायकवाडची बॅट अद्याप शांतच आहे.

धोनीने खेळला ३५० वा टी-२० सामना
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपला ३५० वा टी-२० वा सामना खेळला. तो सर्वाधिक टी-२० सामने खेळणारा कर्णधार रोहित शर्मानंतर (३७४) भारताचा दुसरा खेळाडू ठरला. टी-२० मध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या केरॉन पोलार्ड (५३८) च्या नावावर आहे.

आयपीएल-2022 गुणतालिका
टीम सामने विजय पराभव टाय एन/आर गुण रनरेट राजस्थान 02 02 00 00 00 04 +2.100
कोलकाता 03 02 01 00 00 04 +0.843
गुजरात 02 02 01 00 00 04 +0.495
पंजाब 03 02 01 00 00 04 +0.238
दिल्ली 02 01 01 00 00 02 +0.065
लखनऊ 02 01 01 00 00 02 -0.011
बंगळुरू 02 01 01 00 00 02 -0.048
मुंबई 02 00 02 00 00 00 -1.029
चेन्नई 03 00 03 00 00 00 -1.251
हैदराबाद 01 00 01 00 00 00 -3.050
मुंबईने २०१४ व २०१८ मध्ये सलामीचे ३ सामने गमावले

>धावफलक नाणेफेक चेन्नई (गाेलंदाजी) पंजाब किंग्ज धावा चेंडू ४ ६ मयंक झे. उथप्पा गो. चौधरी ०४ ०२ ०१ ० शिखर झे. जडेजा गो. ब्राव्हो ३३ २४ ०४ १ भानुका राजपक्षे धावबाद ०९ ०५ ०० १ लिव्हिंगस्टोन झे. रायडू गो. जडेजा ६० ३२ ०५ ५ जितेश झे. उथप्पा गो. प्रिस्टोरियस २६ १७ ०० ३ शाहरुख झे. प्रिस्टोरियस गो.जाॅर्डन ०६ ११ ०० ० स्मिथ झे. ब्राव्हो गो. जॉर्डन ०३ ०७ ०० ० कागिसो रबाडा नाबाद १२ १२ ०१ ० चाहर झे. ब्राव्हो गो. प्रिस्टोरियस १२ ०८ ०१ १ वैभव अरोरा नाबाद ०१ ०२ ०० ० अवांतर : १४, एकूण : २० षटकांत ८ बाद १८० धावा. गडी बाद क्रम : १-४, २-१४, ३-१०९, ४-११५, ५-१४६, ६-१५१, ७-१६१, ८-१७६. गाेलंदाजी : चौधरी ४-०-५२-१, जार्डन ४-०-२३-२, ब्राव्हो ३-०-३२-१, जडेजा ४-०-३४-१, प्रिस्टोरियस ४-०-३०-२, मोइन अली १-०-८-०. चेन्नई सुपर किंग्ज धावा चेंडू ४ ६ उथप्पा झे. मयंक गो. अरोरा १३ १० ०२ ० ऋतुराज झे. धवन गो. रबाडा ०१ ०४ ०० ० मोइन त्रि. गो. अरोरा ०० ०२ ०० ० रायडू झे. शर्मा गो. स्मिथ १३ २१ ०२ ० जडेजा झे. गो. अर्शदीप ०० ०३ ०० ० दुबे झे. अर्शदीप गो. लिव्हिंगस्टोन ५७ ३० ०६ ३ धोनी झे. शर्मा गो. चाहर २३ २८ ०१ १ ब्राव्हो झे. गो. लिव्हिंगस्टोन ०० ०१ ०० ० प्रिस्टोरियस झे. अर्शदीप गो. चाहर ०८ ०४ ०० १ जाॅर्डन झे. लिव्हिंगस्टोन गो. चाहर ०५ ०५ ०० ० मुकेश चौधरी नाबाद ०२ ०२ ०० ० अवांतर : ४, एकूण : १८ षटकांत सर्वबाद १२६ धावा. गडी बाद क्रम : १-१०, २-१४, ३-२२, ४-२३, ५-३६, ६-९८, ७-९८, ८-१०७९-१२१, १०-१२६. गाेलंदाजी : वैभव अरोरा ४-०-२१-२, कागिसो रबाडा ३-०-२८-१, अर्शदीप सिंग २-०-१३-१, ओडियन स्मिथ २-०-१४-१, राहुल चाहर ४-०-२५-३, लिम लिव्हिंगस्टोन ३-०-२५-२.

बातम्या आणखी आहेत...