आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नई-लखनऊ सामना आज; प्रक्षेपण सायं.7.30:चेन्नईचा 4 वर्षांनंतर घरच्या मैदानावर सामना

चेन्नई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज चार वर्षांनंतर आपल्या घरच्या मैदानावर उतरणार आहे. यजमान चेन्नई संघाचा यंदाच्या आयपीएलमधील दुसरा सामना आज साेमवारी लाेकेश राहुलच्या लखनऊ सुपरजायंट्सशी हाेणार आहे. हे दाेन्ही संघ चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजेपासून समाेरासमाेर असतील. धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाची लीगची सुरुवात निराशाजनक झाली. टीमला सलामी सामन्यात शुक्रवारी गत चॅम्पियन गुजरात संघाने धूळ चारली. दुसरीकडे लाेकेश राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ संघाने शनिवारी आपल्या घरच्या मैदानावर विजयी सलामी दिली. संघाने दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी मात केली.

महाराष्ट्राच्या राजवर्धन, ऋतुराजवर नजर : महाराष्ट्रातील युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि राजवर्धन हंगरगेकर यंदाच्या आयपीएलमध्ये तुफानी फाॅर्मात आहे. चेन्नईचे प्रतिनिधित्व करताना या दाेघांनी सलामीला अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टीमविरुद्ध लक्षवेधी खेळी केली. पुण्याच्या ऋतुराजने अर्धशतक आणि धाराशिवच्या राजवर्धनने पदार्पणात तीन बळी घेतले.