आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • Chennai Need To Win Today To Stay In The Playoff Race, The Second El Clकोsico Of The Season Today, The Chennai Mumbai Match. 7.30 P.m.

मॅच प्रिव्ह्यू:चेन्नईला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आज जिंकणे आवश्यक, सत्रातील दुसरा एल क्लासिको आज, चेन्नई-मुंबई लढत सायं. 7.30 वा

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या यंदाच्या सत्रात प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जला मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे. सत्रातील दुसऱ्या एल क्लासिकोमध्ये गुरुवारी दोन्ही संघ आमने-सामने येतील. २१ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा ३ गडी राखून पराभव केला होता. चेन्नई आणि मुंबई या लीगमध्ये एकूण ३५ सामने खेळले आहेत. यामध्ये मुंबईचे वर्चस्व आहे. संघाने ६० टक्के म्हणजे २० सामने जिंकले आहेत, तर चेन्नईने ४० टक्के म्हणजे १५ सामने जिंकले. त्याचबरोबर गेल्या पाच सामन्यांत चेन्नईचा वरचष्मा राहिला. चेन्नईने ३ सामने, तर मुंबईने २ सामने जिंकले आहेत. १ मे २०२१ नंतर मुंबई संघ चेन्नईविरुद्ध ३७६ दिवसांपासून जिंकला नाही. यंदाच्या सत्रात मुंबईची कामगिरी चांगली झाली नाही. संघाने चालू सत्रात ११ पैकी केवळ २ सामने जिंकले असून ४ गुणांसह गुणतालिकेत तळाशी आहे. दुसरीकडे, चेन्नई ११ पैकी ४ सामने जिंकून ८ गुणांसह नवव्यास्थानी आहे.

मुंबई इंडियन्स : संघाला फलंदाजी व गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार
मुंबई इंडियन्सला यंदाच्या सत्रात सर्वात यशस्वी संघासारखी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. संघाचे फलंदाज अपयशी ठरले आणि गोलंदाजांनीही आजवर चांगली कामगिरी केली नाही. टिळक वर्माने १३६.३२ च्या स्ट्राइक रेटने ३३४ धावा केल्या आणि तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याचबरोबर सर्वात महाग ईशान किशन ३२१ धावांसह संघातील दुसरा यशस्वी फलंदाज आहे. कर्णधार रोहित शर्माची बॅट अद्याप शांत आहे. फॉर्मात असलेला सूर्यकुमार दुखापतीमुळे सत्रातून बाहेर झाला. संघातील केवळ तीन खेळाडूंनी अर्धशतके झळकावली आहेत. गोलंदाजीत फक्त एका खेळाडूला १० बळी घेता आले आहेत. जसप्रीत बुमराहने ११ सामन्यांत १० गडी बाद केले. त्याचबरोबर मुरुगन अश्विन ९ बळींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज : फलंदाजीत बदल आवश्यक आहे, गोलंदाजी चांगली
चेन्नई सुपरकिंग्जला फलंदाजीत बदल करण्याची गरज आहे. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉन्वे चांगली कामगिरी करत आहेत, पण त्यानंतर संघाचे फलंदाज स्थिर नाहीत. शिवम दुबे आणि अंबाती रायडू यांच्यात सातत्य नाही. त्यांना मैदानावर टिकून राहावे लागेल. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आक्रमक फलंदाजी करणाऱ्या रॉबिन उथप्पाला पुन्हा लयीत यावे लागेल. कर्णधार धोनीही संघासाठी धावा चोरण्यात यशस्वी होत आहे. त्याचबरोबर काही सामन्यांसाठी कर्णधार बनलेला रवींद्र जडेजा संघाबाहेर आहे. गोलंदाजीत संघ जवळपास जुन्याच लयीत असल्याचे दिसत आहे. ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी आणि महिश तीक्ष्णा यांनी १० पेक्षा अधिक गडी बाद केले. मोईन अलीने ७ सामन्यांत ६.८१ च्या इकॉनॉमीसह ५ बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...