आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CSK ने जिंकला हंगामातील पहिला एल-क्लासिको सामना:1000 व्या IPL सामन्यात मुंबईला 7 गड्यांनी हरवले; रहाणे-जडेजा ठरले गेमचेंजर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल-16 मधील शनिवारी झालेल्या पहिल्या एल-क्लासिको सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला 7 गड्यांनी हरवले. मुंबईच्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात मुंबईने दिलेले 158 धावांचे आव्हान चेन्नईने 18.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले.

चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने वेगवान 61 धावा करत संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. तर ऋतुराज गायकवाडने 40 धावांची संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला शिवम दुबेने 28 धावा तर अंबाती रायुडूने 20 धावा करत मोलाची साथ दिली. या सर्वांच्या खेळीने चेन्नईने मुंबईवर मात केली.

मुंबईकडून बेहरनडोर्फ, कार्तिकेय आणि चावलाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

पाहा सामन्याचे लाइव्ह स्कोअरकार्ड

अशा पडल्या चेन्नईच्या विकेट

  • पहिलीः पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जेसन बेहरनडोर्फने डेवोन कॉनवेला बोल्ड केले.
  • दुसरीः आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पीयूष चावलाने अजिंक्य रहाणेला सूर्यकुमार यादवच्या हाती झेलबाद केले.
  • तिसरीः 15 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कुमार कार्तिकेयने शिवम दुबेला बोल्ड केले.

चेन्नईचा डाव

मुंबईने प्रथम फलंदाजी करत दिलेल्या 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा पहिला गडी पहिल्या षटकातच बाद झाला. चेन्नईचा ओपनर कॉनवे शून्यावरच जेसन बेहरनडोर्फ़च्या चेंडूवर बोल्ड झाला. नंतर ऋतुराज आणि अजिंक्यने चांगली भागीदारी करत चेन्नईच्या डावाला आकार दिला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. अजिंक्यला पीयूष चावलाने 8 व्या षटकात बाद केले. नंतर 15 व्या षटकात कार्तिकेयने शिवम दुबेला 28 धावांवर बाद केले. चेन्नईच्या ऋतुराजने 40 आणि अंबाती रायुडूने 20 धावांची नाबाद खेळी केली.

IPL 2023 मधील वेगवान अर्धशतक

चेन्नई सुपर किंग्ससाठी डेब्यू करणारा अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या संधीचा फायदा घेत त्याने धुँवाधार फटकेबाजी करत 19 चेंडूंतच अर्धशतक पूर्ण केले. हे या आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याने कोलकात्याचा शार्दुल ठाकूर आणि राजस्थानच्या जोस बटलरचा विक्रम मोडला. दोघांनी 20 चेंडूंत अर्धशतक केले होते.

पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी

158 धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईचा ओपनर डेवोन कॉनवे पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. नंतर आलेल्या अजिंक्य रहाणेने पॉवर प्लेमध्येच जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ऋतुराज गायकवाडसह संघाची धावसंख्या 6 षटकांत 68 वर नेली.

मुंबईचा डाव

तत्पूर्वी चेन्नईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या मुंबईने 20 षटकांत 8 गडी गमावून 157 धावा करत चेन्नईला विजयासाठी 158 धावांचे आव्हान दिले. मुंबईकडून ईशान किशनने सर्वाधिक 32, तर त्यानंतर टिम डेव्हिडने 31, तिलक वर्माने 22, रोहित शर्माने 21, ऋतिक शौकिनने 18, कॅमेरून ग्रीनने 12 धावा केल्या.

मुंबईच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली.
मुंबईच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली.

चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर तुषार देशपांडे आणि मिचेल सँटरनरने प्रत्येकी 2 गडी बाद केले. सिसांडा मगालाने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी फलंदाजीला आलेल्या मुंबईचे ओपनर रोहित शर्मा आणि ईशान किशनने वेगवान सुरूवात करत 38 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर तुषार देशपांडेच्या एका चेंडूवर रोहित शर्मा बोल्ड झाला. त्याने 21 धावा केल्या. त्यानंतर ईशान किशनने कॅमेरून ग्रीनसह धावफलक हलता ठेवला. मात्र रविंद्र जडेजाच्या एका चेंडूवर तो प्रीटोरियसच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव 1 धाव करून सँटनरच्या चेंडूवर धोनीच्या हाती झेलबाद झाला. तर नंतर पुढच्याच षटकात रविंद्र जडेजाने कॅमेरून ग्रीनला बाद केले. यानंतर टिम डेव्हिड आणि तिलक वर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तिलक वर्मा 22 धावांवर असताना रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पायचित झाला. नंतर 16 व्या षटकात ट्रिस्टन स्टब्स मगालाच्या चेंडूवर झेलबाद झाला. तर 17 व्या षटकात टिम डेव्हिड 31 धावा करून तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

रोहित-ईशानची वेगवान सुरूवात

टॉस हरल्यानंतर फलंदाजीला आलेल्या मुंबईचे ओपनर रोहित शर्मा व ईशान किशनने वेगवान सुरूवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली. रोहित आऊट झाल्यावर ईशानने कॅमेरून ग्रीनसह डाव पुढे नेला आणि 6 षटकांत 61 धावसंख्या उभारली.

अशा पडल्या मुंबईच्या विकेट

  • पहिलीः चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तुषार देशपांडेने रोहित शर्माला बोल्ड केले.
  • दुसरीः सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रविंद्र जडेजाने ईशान किशनला ड्वेन प्रीटोरियसच्या हाती झेलबाद केले.
  • तिसरीः आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिचेल सँटनरने सूर्यकुमार यादवला धोनीच्या हाती झेलबाद केले.
  • चौथीः नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रविंद्र जडेजाने कॅमेरून ग्रीनला स्वतः झेलबाद केले.
  • पाचवीः दहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिचेल सँटनरने अर्शद खानला पायचित केले.
  • सहावीः 13 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रविंद्र जडेजाने तिलक वर्माला पायचित केले.
  • सातवीः 16 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सिसांडा मगालाने ट्रिस्टन स्टब्सला ऋतुराज गायकवाडच्या हाती झेलबाद केले.
  • आठवीः 17 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तुषार देशपांडेने टिम डेव्हिडला अजिंक्य रहाणेच्या हाती झेलबाद केले.

दोन्ही संघाचे प्लेइंग-11

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगरगेकर.

इम्पॅक्टफूल प्लेयर : : प्रशांत सोळंकी, तुषार देशपांडे, सिमरजित सिंग.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, ट्रिस्टन स्टब्स, टीम डेव्हिड, जेसन बेहरेनडॉर्फ, अर्शद खान आणि पियुष चावला.

इम्पॅक्टफूल प्लेयर : हृतिक शोकीन, विष्णू विनोद, शम्स मुलाणी, संदीप वॉरियर.

एल- क्लासिको का म्हटले जाते

CSK आणि MI यांच्यातील सामन्याला लीगचा एल-क्लासिको सामना असेही म्हणतात. एल-क्लासिको हा स्पॅनिश शब्द आहे. ज्याचा अर्थ होतो उत्कृष्ट. स्पॅनिश फुटबॉलमध्ये, बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील सामन्याला एल क्लासिको म्हणतात, कारण दोन्ही 'ला लीग' मधील सर्वात यशस्वी क्लब आहेत. त्याचप्रमाणे, आयपीएलमध्ये सीएसके आणि एमआय यांच्यातील सामन्याला एल क्लासिको म्हटले जाते. कारण मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आणि चेन्नईने 4 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळेच की काय, खेळांडूसोबत चाहतेही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत....

चेन्नई आपल्या तिसऱ्या सामन्यासाठी उतरणार
या हंगामातील चेन्नई सुपर किंग्जचा हा तिसरा सामना असेल. या संघाने एक सामना जिंकला असून एक पराभव केला आहे. पहिल्या सामन्यात त्याला गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात संघाने लखनऊचा पराभव केला.

डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, मोईन अली, सिसांडा मागाला आणि ड्वेन प्रिटोरियस हे मुंबईविरुद्धच्या संघातील 4 परदेशी खेळाडूंमध्ये असू शकतात. तसेच याशिवाय कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड आणि रवींद्र जडेजा हेही संघाला अधिक बळ देऊ शकतात.

मुंबई पहिल्या विजयाच्या शोधात
या हंगामातील मुंबई इंडियन्सचा हा दुसरा सामना असेल. ते मोसमातील पहिला विजय शोधत आहेत. पहिल्या सामन्यात बंगळुरूकडून संघाचा पराभव झाला होता. त्यानंतर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे बंगळुरूच्या उच्च धावसंख्येच्या खेळपट्टीवर प्लॉप ठरले.

चेन्नईविरुद्ध संघाचे चार परदेशी खेळाडू कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, जेसन बेहरेनडॉर्फ आणि जोफ्रा आर्चर असू शकतात. याशिवाय रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हेही संघाला अधिक मजबूत करू शकतात.

चेन्नईवर मुंबई टीम नेहमीच वरचढ
CSK आणि MI संघ सर्वात यशस्वी IPL संघ आहेत. मुंबई पाच वेळा तर चेन्नई चार वेळा चॅम्पियन आहे. या स्पर्धेत आतापर्यंत दोघांमध्ये सर्वाधिक 34 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये मुंबईने 20 वेळा तर चेन्नईने 14 वेळा विजय मिळवला आहे.