आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र केसरी:दावेदार किरण भगत, आदर्श गुंड पराभवासह स्पर्धेतून बाहेर, आयोजनाच्या सहभागावरून स्पर्धेतील वाद चव्हाट्यावर

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुरुवातीपासूनच अनुभवी खेळाडूंपुढे युवा मल्लांनी मोठे आव्हान उभे केले. यजमान साताऱ्याचा दावेदार अनुभवी मल्ल किरण भगतला गाेंदियाच्या वेताळ शेळकेने पराभूत केले. गत महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने मुंबईच्या आदर्श गुंडला पराभूत करत स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. सिकंदर शेखने हिंगोलीच्या दिगंबर भुतकरवर एकतर्फी ४-० गुणांनी मात केली. औरंगाबादच्या मेघनाथ शिंदेने उस्मानाबादच्या विजय मांडवेला हरवले. त्याचबरोबर, इतर लढतीत गटात संग्राम पाटील, विलास डाेईफाेडे,अक्षय मदने, गणेश जगताप, अक्षय शिंदे, अक्षय गरुड यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्याला नमवत पुढील फेरीत प्रवेश केला.

आयोजनाच्या सहभागावरून स्पर्धेतील वाद चव्हाट्यावर
सातारा येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनात दीपक पवार व सुधीर पवार प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत असल्याकारणाने, सर्वांना आयोजनात सहभागी करून न घेतल्याने कुस्तीप्रेमींनी नाराजी व्यक्ती केली. त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर बहिष्कार घालत असल्याचे उपमहाराष्ट्र केसरी साहेबराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगत वादाला तोंड फोडले आहे. साहेबराव पवार व कुटुंबीय स्पर्धेत नको इतका हस्तक्षेप करत आहेत. ते स्पर्धेच्या संयोजनात एकाधिकारशाहीपणे काम करत आहेत. ‘ज्यांनी आयुष्यात कधीच कुस्ती खेळली नाही त्यांनी आम्हाला वस्तादगिरी शिकवू नये,’ असेही वनराज जाधव म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...