आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत देश कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेशी झुंज देत आहे. दरम्यान, देशाला जगातील विविध देशांसह आता क्रिडा जगतही मदतीसाठी पुढे आला आहे. याच पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही कोरोनाच्या लढाईत मदत म्हणून 37 लाख (50 हजार डॉलर) रुपयांची देणगी दिली आहे. यामुळे भारताला आता कोरोना विरुद्धच्या लढा अधिक तीव्र करता येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया ऐकमेकांचे चांगले मित्र असून देशातील सध्याच्या परिस्थितीवरुन मोठ्या प्रमाणावर चिंतेत असल्याचे ही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, भारतीय संघ आमचा चांगला जोडीदार असल्याने आम्ही त्यांच्याबरोबर प्रत्येक टप्प्यात सोबत आहोत.
ब्रेट ली आणि कमिन्स यांनीही केली होती मदत
भारताला कोरोनाकाळात मदत मिळावी यासाठी यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी 1 बिटकॉईन म्हणजे 41 लाख रुपये देणगी दिली होती. तसेच वेगवान गोलंदाज पँट कमिंस यांनीदेखील 37 लाख रुपये मदत म्हणून दिली होती.
तीन क्रिकेटरची आयपीएलमधून माघार
कोरोनाची वाढती पार्श्वभूमी लक्षात घेता आयपीएलमधील तीन खेळाडूंनी माघार घेतली आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा रविचंद्रन आश्विन आणि आरसीबीचा केन रिचर्डसन आणि ऍडम जम्पा यांचा समावेश आहे. दरम्यान, रिचर्डसन आणि जम्पा हे विमान सेवा बंद असल्याने भारतातच अडकले आहे. परंतु, लीग समाप्त झाल्यावर सर्व खेळाडूंना घरी सोडणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
भारतीय खेळाडूही यात मागे नाहीत
कोरोना महामारीत देशात ऑक्सिजन नसल्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागेल आहे. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या कुटूंबाने ग्रामीण भागासाठी 200 ऑक्सिजन कॅन्सन्ट्रेटर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने एक कोटी तर आयपीएलच्या दिल्ली कॅपिटलस (डीसी) फ्रँचायझींनी 2.50 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.