आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIPL 2023 क्वालिफायरचा पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. साखळी फेरीत 10 सामने जिंकून गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच वेळी, सीएसकेने त्यांच्या 14 सामन्यांत 8 सामने जिंकले आणि 17 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. आता दोन्ही संघांमध्ये आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना खेळवला जात आहे.
पहिला क्वालिफायर जिंकणारा संघ जातो अंतिम फेरीत
आजचा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये पोहोचेल. म्हणजेच आज CSK आणि गुजरात यापैकी एक संघ अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरेल. त्याचबरोबर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार नसून, क्वालिफायर सामन्यात पराभूत झालेल्या संघाला एलिमिनेटर सामन्यात सामोरे जावे लागले.
अंतिम सामना
पहिला क्वालिफायर आणि दुसरा क्वालिफायर सामना जिंकण्यात यशस्वी ठरलेल्या दोन संघांमध्ये अंतिम सामना होणार आहे. 28 मे रोजी अहमदाबाद स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळवला जाईल.
पाऊस पडला तर काय?
जर पहिला क्वालिफायर सामना पावसामुळे रद्द झाला तर गुणतालिकेत अव्वल संघ थेट अंतिम सामना खेळेल. म्हणजे अंतिम तिकीट मिळवण्यात गुजरातला यश येईल. त्याच वेळी, आयपीएल 2023 फायनलसाठी एक राखीव दिवस देखील ठेवण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.