आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • CSK Vs KKR 15th IPL Match LIVE Score MS Dhoni Eoin Morgan Chennai Super Kings Kolkata Knight Riders Mumbai Wankhede Stadium Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CSK vs KKR:चेन्नईचा धमाकेदार विजय; ऋतुराज आणि डुप्लेसिसच्या अर्धशतकानंतर दीपकने 4 विकेट घेतल्या

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोलकाताकडून आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्सने अर्धशतके केली

आयपीएल २०२१ च्या १५ व्या सामन्यात ऋतुराज गायकवाड (६४) व डुप्लेसिसच्या (९५) तुफानी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला १८ धावांनी हरवले. चेन्नईने सत्रातील तिसरा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवले. प्रथम खेळताना चेन्नईने ३ बाद २२० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात, कोलकाता संघ १९.१ षटकांत सर्वबाद २०२ धावा करू शकला. आघाडीचे पाच फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले नाहीत. अखेरच्या षटकांमध्ये कार्तिक (४०), रसेल (५४) व कमिन्सच्या (६६*) फटकेबाजीने लढतीत रंगत आणली होती. चेन्नईच्या दीपक चाहरने ४ व एनगिडीने ३ बळी घेतले.

राहुल सर्वात वेगवान 5 हजार धावा करणार भारतीय
खेळाडू 5 हजार धावा
ख्रिस गेल 132 डाव
केएल राहुल 143 डाव
शॉन मार्श 144 डाव
बाबर आझम 145 डाव
अॅरोन फिंच 159 डाव

कोलकाताची कामगिरी

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने कोलकाताला 221 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ सर्वबाद 202 धावांची मजल मारू शकला. कोलकाताकडून ऑलराउंडर आंद्रे रसेलने 22 बॉलमध्ये 54 , दिनेश कार्तिकने 24 बॉलमध्ये 40 आणि पॅट कमिन्सने 34 बॉलमध्ये 66 धावांची खेळी केली. तर, चेन्नईकडून दिपक चाहरने 4, लुंगी एनगिडीने 3 आणि सॅम करनने एक विकेट घेतली.

चेन्नईची कामगिरी

चेन्नई सुपर किंग्सने 3 विकेट गमावून 220 धावा केल्या. यात डुप्लेसिसने 60 बॉलमध्ये सर्वाधिक 95 आणि ऋतुराजने 42 बॉलमध्ये 64 धावांची खेळी केली. हे या सीजनचे दोघांचे पहिले अर्धशतक होते. तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या मोईन अलीने 12 बॉलमध्ये 25 रन केले. तर, कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने ऋतुराजला आणि सुनील नरेनने मोइन अलीला आउट केले. यानंतर कर्णधार एमएस धोनीला आंद्रे रसले झेलबाद केले.

दोन्ही संघात 4-4 परदेशी खेळाडू

चेन्नईच्या टीमने फाफ डुप्लेसिस, मोइन अली, लुंगी एनगिडी आणि सॅम करनला संधी दिली आहे. तर, कोलकाताच्या प्लेइंग-11 मध्ये कर्णधार ओएन मोर्गन, आंद्रे रसेल, पॅट कमिंस आणि शाकिब अल हसन आहेत.

दोन्ही संघ

कोलकाता: नीतीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, ओएन मोर्गन(कर्णधार), शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, पैट कमिंस, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.

चेन्नई: महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोइन अली, रविंद्र जडेजा, सैम करन, लुंगी एनगिडी, शार्दूल ठाकुर आणि दीपक चाहर.

बातम्या आणखी आहेत...