आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2023 : लखनऊ v/s चेन्नई सामना पावसामुळे रद्द:दोन्ही संघांना 1-1 गुण; लखनऊने 19.2 षटकांत केल्या होत्या 125 धावा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीग-16 मधील चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध लखनऊ सुपरजायंटस यांच्यातील 45 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला आहे.

सामना रद्द होण्यापूर्वी लखनऊने पहिल्या डावात फलंदाजी करत लखनऊने 19.2 षटकांत 7 बाद 125 धावा केल्या होत्या. तेव्हा पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पावसामुळे चेन्नईला 19 षटकांत 127 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही पावसाचा व्यत्यय राहिल्याने सामना रद्द करण्यात आला.

आयुष बडोनीचे अर्धशतक

लखनऊसाठी आयुष बडोनीने एकाना क्रिकेट स्टेडियमवर नाबाद 59 धावा केल्या. निकोलस पूरनने 20, तर काईल मेयर्सने 14 धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून मोईन अली, महिश तीक्षाना आणि मथिश पाथिराना यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

लखनऊचा डाव

प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनऊची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर काईल मेयर्स चौथ्या षटकात 14 धावांवर आऊट झाला. मोईन अलीने त्याची विकेट घेतली. त्यानंतर सहाव्या षटकात तीक्षणाने मनन वोहराला 14 धावांवर तर कृणाल पंड्याला शून्यावर बाद केले. तर पुढच्याच षटकात रविंद्र जडेजाने मार्कस स्टॉयनिसला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर दहाव्या षटकात मोईन अलीने कर्ण शर्माला 9 धावांवर बाद केले. अवघ्या 44 धावांवर लखनऊचा अर्धा संघ गारद झाला. त्यानंतर निकोलस पूरन आणि आयुष बडोनीने डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केली. पूरनला अठराव्या षटकात 20 धावांवर बाद करत मथिषा पथिरानाने ही जोडी फोडली. दरम्यान, बडोनीने अर्धशतक पूर्ण केले. तर विसाव्या षटकात कृष्णप्पा गौतमलाही पथिरानाने 1 धावेवर बाद केले. 19.2 षटकांत 7 बाद 125 धावा झालेल्या असताना पावसामुळे सामना थांबवावा लागला. पाऊस थांबल्यानंतर चेन्नईला 19 षटकांत 127 धावांचे सुधारित आव्हान देण्यात आले.

पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड

  • पहिलीः चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोईन अलीने काईल मेयर्सला ऋतुराज गायकवाडच्या हाती झेलबाद केले.
  • दुसरीः सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर महीश तीक्षणाने मनन वोहराला बोल्ड केले.
  • तिसरीः सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर महीश तीक्षणाने कृणाल पंड्याला अजिंक्य रहाणेच्या हाती झेलबाद केले.
  • चौथीः सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रविंद्र जडेजाने मार्कस स्टॉयनिसला बोल्ड केले.
  • पाचवीः दहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोईन अलीने कर्ण शर्माला स्वतःच झेलबाद केले.
  • सहावीः अठराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मथिषा पथिरानाने निकोलस पूरनला मोईन अलीच्या हाती झेलबाद केले.
  • सातवीः विसाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मथिषा पथिरानाने कृष्णप्पा गौतमला अजिंक्य रहाणेच्या हाती झेलबाद केले.

बडोनी-पूरने सावरला डाव, बडोनीची फिफ्टी

अर्धा संघ 44 धावांवर गारद झालेला असताना निकोलस पूरन आणि आयुष बडोनीने डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केली. पूरनला अठराव्या षटकात 20 धावांवर बाद करत मथिषा पथिरानाने ही जोडी फोडली. दरम्यान, बडोनीने अर्धशतक पूर्ण केले.

44 धावांवर निम्मा संघ गारद

प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनऊची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर काईल मेयर्स चौथ्या षटकात 14 धावांवर आऊट झाला. मोईन अलीने त्याची विकेट घेतली. त्यानंतर सहाव्या षटकात तीक्षणाने मनन वोहराला 14 धावांवर तर कृणाल पंड्याला शून्यावर बाद केले. तर पुढच्याच षटकात रविंद्र जडेजाने मार्कस स्टॉयनिसला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर दहाव्या षटकात मोईन अलीने कर्ण शर्माला 9 धावांवर बाद केले. अवघ्या 44 धावांवर लखनऊचा अर्धा संघ गारद झाला.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

लखनऊ सुपर जायंट्स : कृणाल पंड्या (कर्णधार), काईल मेयर्स, मनन वोहरा, कर्ण शर्मा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, नवीन उल हक, रवि बिश्नोई आणि मोहसिन खान.

इम्पॅक्ट प्लेयर्स : डिकॉक, दीपक हुडा, डॅनिएल सॅम्स, यश ठाकूर, प्रेरक मंकड.

चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, दीपक चहर, मथीषा पथिराना, तुषार देशपांडे आणि महीश तीक्षणा.

इम्पॅक्ट प्लेयर : अंबाती रायुडू, मिशेल सेंटनर, एस संपाती, शेख रशीद आणि अकाश सिंह.

लखनऊने 9 पैकी 5 सामने जिंकले
लखनऊने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांत 5 विजय आणि 4 पराभव पत्करले आहेत. संघाचे 10 गुण आहेत. लखनऊला मागील सामन्यात बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला होता. चेन्नईविरुद्ध संघाचे 4 विदेशी खेळाडू काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन आणि नवीन-उल-हक असू शकतात. याशिवाय रवी बिश्नोई, केएल राहुल आणि अमित मिश्रा हे खेळाडू संघाला बळ देत आहेत.

चेन्नईनेही 9 पैकी 5 सामने जिंकले
चेन्नईने या मोसमात आतापर्यंत नऊ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने पाच जिंकले आणि चार सामने गमावले. CSK चे आता 10 गुण आहेत. चेन्नईला गेल्या सामन्यात पंजाबकडून पराभव पत्करावा लागला होता. डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, मथिशा पथिराना आणि महिश तीक्षणा हे लखनऊविरुद्ध संघाचे 4 विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय ऋतुराज गायकवाड, महेंद्रसिंह धोनी, अजिंक्य रहाणे हे खेळाडू संघाला मजबूत करत आहेत.

हेड टू हेड
लखनऊचा हा दुसरा सीझन आहे. हेड टू हेड बद्दल बोलायचे झाले तर लखनऊ आणि चेन्नई समान पातळीवर आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण दोन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये लखनऊ आणि चेन्नईने एकदा विजय मिळवला आहे.