आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आयपीएल-16 च्या सहाव्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने लखनऊवर 12 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने दिलेले 218 धावांचे आव्हान पार करताना लखनऊच्या संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 205 धावा केल्या.
सुमारे चार वर्षांनंतर होम ग्राऊंड चेपॉकच्या मैदानावर चेन्नईने टॉस हरल्यानंतर फलंदाजी करताना 20 षटकांत 7 विकेट गमावून 217 धावा केल्या. संघाने IPL मध्ये 24 व्यांदा 200+ स्कोअर करण्याचा विक्रमही केला. प्रत्युत्तरात लखनऊचे बॅटर्स 20 षटकांत 7 विकेट वर 205 रनच करू शकले.
मॅचचे टर्निंग पॉइंट्स
पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड
पहिल्या दोन सामन्यात फिफ्टी करणारा मेयर्स पहिला खेळाडू
काईल मेयर्स सलग दुसरे अर्धशतक करून आऊट झाला.पहिल्या दोन मॅचमध्ये फिफ्टी करणारा तो आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू बनला आहे.
अशा पडल्या लखनऊच्या विकेट
चेन्नईचा डाव
चेन्नईने 24 व्यांदा 200+ स्कोअर केला
चेपॉक स्टेडियममध्ये लखनऊने टॉस जिंकून बॉलिंग घेतली आणि चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत 7 विकेटवर 217 धावा केल्या. टीमने सर्वाधिक 24व्यांदा 200+ स्कोअर केला आहे. अखेरच्या षटकात कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मार्क वूडच्या बॉलवर सलग दोन षटकार ठोकले.
ऋतुराज गायकवाडने 31 चेंडूंत 57 धावा केल्या. तर ड्वेन कॉनवेने 47 धावा केल्या. शिवम दुबे आणि अंबाती रायडूने 27-27 धावा केल्या. मार्क वूड आणि रवी बिश्नोईने 3-3 विकेट घेतल्या. चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि ड्वेन कॉनवेने 110 धावांची भागीदारी केली. ऋतुराजने 25 चेंडूंतच आपली फिफ्टी पूर्ण केली. ऋतुराज गायकवाडचे हे 12 वे तर सध्याच्या हंगामातील सलग दुसरे अर्धशतक आहे.
अशा पडल्या चेन्नईच्या विकेट
धोनीच्या 5000 IPL धावा पूर्ण
महेंद्रसिंह धोनीने चेपॉक मध्ये 3 चेंडूं 2 षटकारांच्या मदतीने 12 धावा केल्या. यासोबतच धोनीचे IPL मधील 5000 धावा पूर्ण झाल्या. ही धावसंख्या गाठणारा तो 5 वा भारतीय आणि एकूण 7 वा खेळाडू आहे. धोनीने 237 सामन्यांत या धावा केल्या. IPL च्या 20 व्या षटकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंत धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावे एकूण 55 षटकार आहेत. त्याच्यानंतर केरन पोलार्डच्या नावे 33, रविंद्र जडेजाच्या नावे 26 आणि हार्दिक पंड्याच्या नावे 25 षटकार आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा 23 षटकारांसह यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
9 डावांत तिसरी शतकी भागीदारी
CSK च्या ऋतुराज गायकवाडने IPL च्या या हंगामातील सलग दुसरे अर्धशतक ठोकले. तो 31 चेंडूंत 57 धावा करून आऊट झाला.या खेळीत त्याने 4 षटकार आणि 3 चौकार लगावले. त्याने ड्वेन कॉनवेसह 110 धावांची भागीदारी केली. दोघांतील 9 डावांतील ही तिसरी शतकी भागीदारी आहे. कॉनवे पुढच्याच षटकात 47 धावांवर मार्क वूडच्या चेंडूनर बाद झाला.
पॉवरप्लेमध्ये स्फोटक सुरूवात
टॉस हरल्यावर पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या CSK ला ऋतुराज गायकवाड आणि ड्वेन कॉनवेने स्फोटक सुरुवात मिळवून दिली. दोघांनी पॉवरप्लेच्या 6 षटकांत नाबाद 79 धावा कुटल्या. चेपॉकमधील हा आतापर्यंतचा सर्वाधिक पॉवर प्ले स्कोअर आहे. याआधी 2018 मध्ये CSK नेच केकेआरविरोधात 75 धावा केल्या होत्या.
पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईचे या मोसमात विजयाचे खाते उघडण्याचे लक्ष्य असेल. त्याचबरोबर मोसमातील पहिल्या विजयानंतर लखनऊचा उत्साह शिखरावर आहे.
दोन्ही संघाचे प्लेइंग-11...
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चहर आणि राजवर्धन हंगरगेकर.
प्रभावशाली खेळाडू : अजिंक्य रहाणे, प्रशांत सोळंकी, तुषार देशपांडे, सिमरजित सिंह.
लखनऊ सुपरजायंट्स : केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, निकोलस पूरन, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मार्क वुड, रवी बिश्नोई, आवेश खान आणि यश ठाकूर.
प्रभावशाली खेळाडू : जयदेव उनाडकट, अमित मिश्रा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा, प्रेरक मांकड.
चेन्नई 4 वेळा चॅम्पियन
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. मुंबईनंतर या संघाने स्पर्धेत सर्वाधिक 4 विजेतेपद पटकावले आहेत. संघ 13 पैकी 11 हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचला आणि 9 वेळा अंतिम फेरीतही खेळला. या मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नईला गुजरातविरुद्ध ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. संघाला तो पराभव विसरून या सामन्यावर लक्ष केंद्रित करायला आवडेल.
संघाचे 4 परदेशी खेळाडू डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, मोईन अली आणि मिचेल सँटनर असू शकतात. महीश तीक्षणा सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नाही. याशिवाय धोनी, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, दीपक चहर आणि शिवम दुबे हे भारतीय खेळाडूही संघाला मजबूत करत आहेत.
लखनऊची सुरुवात विजयाने
लखनऊने या मोसमाची सुरुवात विजयाने केली. घरच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात संघाने दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला. सामन्यात काइल मेयर्स आणि मार्क वुड यांनी उत्तम कामगिरी केली.
CSK विरुद्ध संघाचे 4 विदेशी खेळाडू काइल मेयर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस आणि मार्क वुड असू शकतात. क्विंटन डी कॉक सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नाही. याशिवाय रवी बिश्नोई, केएल राहुल आणि दीपक हुडा हे भारतीय खेळाडूही संघाला मजबूत करत आहेत.
लखनऊचे चेन्नईवर वर्चस्व
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपरजायंट्सचा हा फक्त दुसरा हंगाम आहे. पहिल्या सत्रात या संघाने पात्रता फेरी गाठून सर्वांना चकित केले. त्यानंतर लखनऊ आणि चेन्नईचे संघ साखळी फेरीत एकदाच आमनेसामने आले होते. लखनऊने तो सामना जिंकला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.