आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MI ने CSK ला 4 विकेटने हरवले:मुंबईने IPL मध्ये सर्वात मोठे टार्गेट चेस केले, चेन्नईला मागील 9 सामन्यात 7 वेळेस पराभूत केले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

IPL 2021 सीझनमधील 27 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला 4 विकेटने पराभूत केले. हा मुंबईचा लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी मुंबईने 2017 मध्ये पंजाबविरुद्ध 199 धावा केल्या होत्या. मुंबईने चेन्नईला मागील 9 सामन्यात 7 वेळेस पराभूत केले आहे. पोलार्डने 34 बॉलमध्ये 87 धावांची दमदार खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. पोलार्डने केवळ 17 बॉलमध्ये अर्धशतक केले. सीझनमधील हे सर्वात जलद अर्धशतक आहे.

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने 20 ओव्हरमध्ये 4 विकेटवर 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने 6 विकेट गमावून 219 धावा केल्या.

पोलार्डने सीझनमधील सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले. केवळ 17 बॉलमध्ये पोलार्डने लीगमधील आपले 16 वे अर्धशतक पूर्ण केले. यापूर्वी पुर्थ्वी शॉ ने केकेआरविरुद्ध 18 बॉलमध्ये अर्धशतक केले होते. याव्यतिरिक्त अंबाती रायडूने या सामन्यात आणि दीपक हुडाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 20 बॉलमध्ये अर्धशतक केले होते.

मुंबई ने 81 धावांमध्ये 3 विकेट गमावल्या
कर्णधार रोहित शर्मा 24 बॉलवर 35 धावा करून बाद झाला. रोहित आणि डिकॉकमध्ये 71 धावांची ओपनिंग पार्टनरशिप झाली. त्यानंतर सूर्यकुमार यादव काही खास करू शकला नाही. तो 3 धावांवर बाद झाला. डिकॉकला मोईन अलीने आपल्याच बॉलवर कॅच आऊट केले. डिकॉक 28 बॉलवर 38 धावांवर बाद झाला.

चेन्नईचा डाव
अंबाती रायडूने दमदार खेळी करत फक्त 20 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये मध्ये रायडूचे हे 20 वे अर्धशतक आहे. रायडू 27 बॉलवर 72 धावा आणि रवींद्र जडेजा 22 बॉलवर 22 धावा काढून नाबाद राहिले. दोघांमध्ये 5 व्या विकेटसाठी 49 बॉलमध्ये 102 धावांची पार्टनरशिप झाली.

मोईन अली आणि फाफ डुप्लेसिसनेसुद्धा अर्धशतक केले. मोईन 36 बॉलमध्ये 58 धावा काढून तंबूत परतला. हे मोईनचे आयपीएलमध्ये चौथे आणि सीझनमधील पहिले अर्धशतक होते. डुप्लेसिसने 28 बॉलमध्ये 50 धावा केल्या. बुमराहने लीगमध्ये पहिल्यांदा आपल्या 4 ओव्हरमध्ये 56 धावा दिल्या.

चेन्नईने 4 धावांमध्ये 3 विकेट गमावल्या. 112 स्कोअरवर मोईन अली बाद झाला. त्यानंतर पोलार्डने 12 व्या ओव्हरमध्ये सलग 2 बॉलवर फाफ डुप्लेसिस आणि सुरेश रैनाला तंबूत पाठवले. डुप्लेसिसने आयपीएलमध्ये आपले 20 वे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर आपला 200 वा सामना खेळत असलेला रैना 2 धावांवर बाद झाला.

मोईन अलीचे IPL मध्ये चौथे अर्धशतक
मोईनने आयपीएलमध्ये चौथे अर्धशतक पूर्ण केले. या सीझनमधील अलीचे हे पहिले अर्धशतक आहे. बुमराहने अलीला बाद केले. मोईन आणि डुप्लेसिससोबत दुसऱ्या विकेटसाठी 61 बॉलवर 108 धावांची पार्टनरशिप केली.

ऋतुराज काही खास करू शकला नाही
4 धावांवर CSK ची पहिली विकेट गेली. ट्रेंट बोल्टने डावाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये फॉर्ममध्ये असलेल्या ऋतुराज गायकवाडला तंबूत पाठवले. ऋतुराज 4 बॉलवर 4 धावा काढून बाद झाला.

बातम्या आणखी आहेत...