फोटोंमध्ये पाहा CSK vs MI सामन्याचा रोमांच:रायडूच्या षटकाराने रेफ्रिजरेटरचा काच फुटला, मुंबईसाठी लकी चार्म ठरल्या रोहित आणि जहीरची पत्नी
मुंबई इंडियन्स (MI) ने शनिवारी रोमहर्षक सामान्य चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा 4 विकेटने पराभव केला. मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका आणि जहीर खानची पत्नी सागरिका लकी चार्म ठरल्या.
सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 218 धावा केल्या. यामध्ये अंबाती रायडूने 20 बॉलमध्ये अर्धशतक केले. यामध्ये रायडूने 7 षटकार आणि 4 चौकार मारले. ऑफ साईडला मारलेला एक षटकार थेट डगआउटमध्ये ठेवलेल्या रेफ्रिजरेटरवर लागला आणि रेफ्रिजरेटरचा काच फुटला.
चेन्नई संघाच्या अंबाती रायडूने मारलेल्या एका षटकाराने डगआउटमध्ये ठेवलेल्या रेफ्रिजरेटरचा काच फुटला.
रायडूने 20 बॉलमध्ये अर्धशतक केले. आयपीएलमध्ये हे त्याचे 20 वे अर्धशतक आहे.
मोईन अली आणि डुप्लेसिसने दुसऱ्या विकेटसाठी 108 धावांची पार्टनरशिप केली.
जसप्रीत बुमराहने लीगमध्ये पहिल्यांदाच आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 56 धावा दिल्या. यापूर्वी 2015 मध्ये बुमराहने दिल्लीविरुद्ध 55 धावा दिल्या होत्या.
पोलार्डने 2 ओव्हरमध्ये 12 धावा देऊन 2 विकेट घेतल्या.
219 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार आणि ओपनर रोहित शर्माने 24 बॉलमध्ये 35 धावा केल्या.
पोलार्डने केवळ 17 बॉलमध्ये अर्धशतक केले. हे सीझनमधील सर्वात जलद अर्धशतक आहे.
सामना जिंकल्यानंतर पोलार्ड अशाप्रकारे प्रार्थना करताना दिसला.
शेवटी हार्दिक पंड्याने 7 बॉलमध्ये 16 धावा काढल्या. यामध्ये 2 षटकार मारले.