आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईचा मुंबईवर 6 गड्यांनी विजय:कॉनवेची फिफ्टी हुकली, पीयूष चावलाच्या 2 विकेट

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

आयपीएल-16 मधील 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) मुंबई इंडियन्सला (MI) 6 गड्यांनी हरवले. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 8 गडी गमावून 139 धावा करत चेन्नईला विजयासाठी 140 धावांचे आव्हान दिले. चेन्नईने 17.4 षटकांत 4 गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले.

मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला ओपनर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवेने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 46 धावांची भागीदारी केली. पीयूष चावलाने पाचव्या षटकात ऋतुराज गायकवाडला 30 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि कॉनवेने डाव पुढे नेला. मात्र चावलाने नवव्या षटकात अजिंक्य रहाणेलाही 21 धावांवर पायचित केले. त्यानंतर तेराव्या षटकात ट्रिस्टन स्टब्सने अंबाती रायुडूला 12 धावांवर बाद केले. तर डेवॉन कॉनवे सतराव्या षटकात 44 धावांवर बाद झाला. यानंतर शिवम दुबे आणि धोनीने संघाला विजयी धावसंख्या गाठून दिली.

पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड​​​​​​

अशा पडल्या चेन्नईच्या विकेट

 • पहिलीः पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पीयूष चावलाने ऋतुराज गायकवाडला ईशान किशनच्या हाती झेलबाद केले.
 • दुसरीः नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पीयूष चावलाने अजिंक्य रहाणेला पायचित केले.
 • तिसरीः तेराव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सने अंबाती रायुडूला राघव गोयलच्या हाती झेलबाद केले.
 • चौथीः सतराव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आकाश मधवालने डेवॉन कॉनवेला पायचित केले.

प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईची सुरूवात खराब झाली. 3 षटकांतच त्यांचे तीन फलंदाज बाद झाले. मुंबईचा ओपनर कॅमेरून ग्रीन दुसऱ्या षटकात 6 धावांवर आऊट झाला. तुषार देशपांडेने त्याला बोल्ड केले. तर तिसऱ्या षटकात दीपक चहरने ईशान किशनला 7 धावांवर तर रोहित शर्माला शून्यावर बाद केले. सूर्यकुमार यादव आणि निहाल वढेराने डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 55 धावांची भागीदारी केली. अकराव्या षटकात सूर्यकुमार यादवला 26 धावांवर बाद करत रविंद्र जडेजाने ही जोडी फोडली. त्यानंतर निहाल वढेरा आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी पाचव्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. अठराव्या षटकात निहाल वढेराला 64 धावांवर बाद करत मथीषा पथिरानाने ही जोडी फोडली. त्यानंतर एकोणिसाव्या षटकात तुषार देशपांडेने टिम डेव्हिडला 2 धावांवर बाद केले. तर विसाव्या षटकात मथीषाने अर्शद खानला 1 धावेवर, तर ट्रिस्टन स्टब्सला 20 धावांवर बाद केले. मुंबईला 20 षटकांत 8 गडी गमावून 139 धावांचा पल्ला गाठता आला.

अशा पडल्या मुंबईच्या विकेट

 • पहिलीः दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तुषार देशपांडेने कॅमेरून ग्रीनला बोल्ड केले.
 • दुसरीः तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दीपक चहरने ईशान किशनला महीष तीक्षणाच्या हाती झेलबाद केले.
 • तिसरीः तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर दीपक चहरने रोहित शर्माला रविंद्र जडेजाच्या हाती झेलबाद केले.
 • चौथीः अकराव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रविंद्र जडेजाने सूर्यकुमार यादवला बोल्ड केले.
 • पाचवीः अठराव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मथीषा पथिरानाने निहाल वढेराला बोल्ड केले.
 • सहावीः एकोणिसाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तुषार देशपांडेने टिम डेव्हिडला ऋतुराज गायकवाडच्या हाती झेलबाद केले.
 • सातवीः विसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मथीषा पथिरानाने अर्शद खानला ऋतुराज गायकवाडच्या हाती झेलबाद केले.
 • आठवीः विसाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मथीषा पथिरानाने ट्रिस्टन स्टब्सला रविंद्र जडेजाच्या हाती झेलबाद केले.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11...

चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दूबे, रविंद्र जडेजा, मथीषा पथिराना, तुषार देशपांडे, महीश तीक्षणा आणि दीपक चहर.

इम्पॅक्ट प्लेयर : अंबाती रायुडू, मिशेल सँटनर, सुभ्रांशू सेनापती, शेख रशीद, आकाश सिंह.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, निहाल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, आकाश मधवाल आणि अर्शद खान.

इम्पॅक्ट प्लेयर : कुमार कार्तिकेय, रमनदीप सिंह, डेवाल्ड ब्रेविस, राघव गोयल, विष्णू विनोद.

चेन्नईने 10 पैकी 5 सामने जिंकले
चेन्नईने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 5 विजय आणि 4 पराभव पत्करले आहेत. एक सामना पावसामुळे रद्द झाला. संघाचे 11 गुण आहेत. डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, मथिशा पथिराना आणि महिश तीक्षणा हे मुंबईविरुद्ध संघाचे 4 विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी हे खेळाडू संघाला मजबूत करत आहेत.

मुंबईने 9 पैकी 5 सामने जिंकले
या मोसमात मुंबईने आतापर्यंत नऊ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने पाच जिंकले आणि चार सामने गमावले. एमआयचे आता 10 गुण आहेत. मुंबईने गेल्या सामन्यात पंजाबचा सहा विकेट्सने पराभव केला होता. चेन्नईविरुद्ध संघाचे 3 विदेशी खेळाडू टीम डेव्हिड, कॅमेरून ग्रीन आणि जोफ्रा आर्चर असू शकतात. याशिवाय सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, पियुष चावला हे खेळाडू संघाला मजबूत करत आहेत.

मुंबईचे पारडे जड
CSK आणि MI संघ सर्वात यशस्वी IPL संघ आहेत. मुंबई पाच वेळा तर चेन्नई चार वेळा चॅम्पियन बनली आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 35 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये मुंबईने 20 वेळा तर चेन्नईने 15 वेळा विजय मिळवला आहे.