आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • CSK Vs PBKS 8th IPL Match LIVE Score; MS Dhoni KL Rahul Suresh Raina Chris Gayle | Mumbai Wankhede Stadium News | Chennai Super Kings Vs Punjab Kings IPL 2021 Live Cricket Score Latest News Update

CSK Vs Punjab:धोनीच्या द्विशतकी सामन्यामध्ये चहरचा सुपर विजयासाठी कहर; चेन्नई सुपरकिंग्जचा पहिला विजय

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुलच्या पंजाबचा दुसऱ्या विजयाचा प्रयत्न अपयशी; चेन्नईची सहा गड्यांनी पंजाबवर मात

युवा गाेलंदाज दीपक चहरच्या (४/१३) भेदक माऱ्यापाठाेपाठ सलामीवीर माेईन अली (४६) अाणि फाफ डुप्लेसिसने (नाबाद ३६) केलेल्या झंझावाती खेळीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने शुक्रवारी अायपीएलमध्ये विजयाचे खाते उघडले. धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने लीगमधील अापल्या दुसऱ्या सामन्यामध्ये लाेकेश राहुलच्या पंजाब किंग्जचा पराभव केला. चेन्नई संघाने ६ गड्यांनी २६ चेंडू राखून सामना जिंकला. चेन्नई संघाला अाता लीगमध्ये विजयाचे खाते उघडता अाले. चेन्नईने विजयाने धाेनीच्या द्विशतकी सामन्याचे विक्रमी यश साजरे केले.

या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर धडक मारली. लाेकेश राहुलचा पंजाब किंग्जचा सलग दुसरा विजय संपादन करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १०६ धावा काढल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने १५.४ षटकांत चार गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून अाणली. संघाच्या विजयामध्ये माेईन अलीचे माेलाचे याेगदान राहिले. त्याने ३१ चेंडूंमध्ये ४६ धावांची खेळी केली. अवघ्या चार धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. त्यानंतर फाफ डुप्लेसिस अाणि सुरेश रैनाने (८) संघाचा विजय निश्चित केला. अाता चेन्नई सुपरकिंंग्जचा स्पर्धेतील तिसरा सामना साेमवारी संजू सॅमसनच्या राजस्थान राॅयल्स संघाविरुद्ध हाेणार अाहे.

नाणेफेक जिंकून चेन्नई सुपरकिंग्ज संघाने प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार धाेनीचा हा निर्णय युवा गाेलंदाजी दीपक चहर, सॅम कॅरन अाणि डॅ्वेन ब्राव्हाेने याेग्य ठरला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या पंजाबची निराशाजनक सुरुवात झाली. टीमचा कर्णधार अाणि सलामीवीर लाेकेश राहुल (५), गेल (१०), दीपक हुडा (१०) स्वस्तात बाद झाले. सलामीवीर मयंक अग्रवाल शून्यावर बाद झाला.

शाहरुखची एकाकी झुंज : पंजाब किंग्ज संघाकडून युवा फलंदाज शाहरुखने एकाकी झंुज दिली. त्याने ३६ चेंडूंत ४७ धावा काढल्या.

दीपक चहरने एका निर्धाव षटकासह घेतल्या चार विकेट
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज टीमचा युवा गाेलंदाज दीपक चहरने शानदार कामगिरी केली. त्याने शुक्रवारी पंजाब किंग्ज संघाविरुद्ध शानदार गाेलंदाजी करताना एका निर्धाव षटकासह चार विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने चार षटकांत अवघ्या १३ धावा देताना चार गड्यांना बाद केले. त्याने पंजाब किंग्जच्या मयंक अग्रवाल (०), गेल ( १०) दीपक हुडा (१०), निकाेलस पूरन (०) यांना बाद करण्याचा पराक्रम गाजवला. याशिवाय सॅम कॅरन अाणि डॅ्वेन ब्राव्हाेने प्रत्येक एक विकेट घेतली. त्यामुळे पंजाब किंग्ज संघाचा माेठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला.

हैदराबादसमोर चेपॉकवर आज मुंबई संघ
आयपीएल २०२१ च्या नवव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघासमाेर अाज शनिवारी गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सचे तगडे आव्हान असेल. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाईल. मुंबईने त्या मैदानावर एक विजय मिळवला व एक सामना गमावला आहे. दुसरीकडे, हैदराबाद अद्याप आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. टीमचा पहिल्या सामन्यात १० व दुसऱ्या सामन्यात ६ धावांनी पराभव झाला. संघ चेपॉकवर आतापर्यंत खेळलेल्या सर्व ५ सामन्यांत पराभूत झाला आहे. चेपॉकच्या खेळपट्टीने आतापर्यंत फलंदाजांना अडचणीत आणले. विलियम्सन दुखापतीमुळे अद्याप सामन्यात उतरला नाही.

पंजाबच्या टॉप-5 फलंदाजांनी अवघ्या 25 धावा केल्या

पंजाब किंग्सच्या टॉप-5 फलंदाजांनी मिळून अवघ्या 25 धावा केल्या. यात कर्णधार लोकेश राहुल(5), क्रिस गेल(10), दीपक हूडा(10), मयंक अग्रवाल(0)आणि निकोलस पूरन(0) धावांवर आउ झाले.

दीपक चाहरने 4 खेळाडूंना माघारी पाठवले

पंजाब किंग्सची अतिशय खराब सुरुवात झाली. पंजाबने पहिल्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट गमावली. दीपक चाहरने मयंक अग्रवालला शून्यावर बोल्ड केले. यानंतर 16 रनांवर संघाला दुसरा झटका लागला. एक धाव घेताना कर्णधार लोकेश राहुल 5 रनांवर आउट झाला. जजेडाने त्याला रनआउट केले.

यानंतर 3 धावा झाल्या की लगेच, दीपकने 5व्या ओव्हरमध्ये पंजाबला 2 झटके दिले. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर क्रिस गेलला जडेजाकडे झेलबाद केले. यानंतर चौथ्या बॉलवर निकोलस पूरन शार्दूल ठाकुरकडे झेलबाद झाला. गेलने 10 बॉलवर 10 रन काढले, तर पूरन शून्यावर आउट झाला. 26 रनांपर्यंत पंजाबचा अर्धा संघ तंबूत परतला होता. दीपकने आपली चौथी विकेट दीपक हूडाची घेतली. हूडाने 15 बॉलवर 10 रन केले.

दोन्ही संघात कोणताच बदल नाही

धोनी आणि पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने आपल्या प्लेइंग-11 मध्ये कुठलेच बदल केले नाहीत. चेन्नई पंजाबविरोधात सलग तिसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरली आहे. मागच्या सीनमध्ये दोन सामन्यात चेन्नईने पंजाबचा पराभव केल होता. या सीजनमध्ये चेन्नईला दिल्लीसमोर पराभवाचा सामना करावा लागला होता. तर, पंजाबने राजस्थानविरोधात चार धावांनी विजय मिळवला.

दोन्ही संघ

चेन्नई: महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोइन अली, रविंद्र जडेजा, सैम करन, ड्वेन ब्रावो, शार्दूल ठाकुर आणि दीपक चाहर.
पंजाब: लोकेश राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हूडा, शाहरुख खान, जे रिचर्ड्सन, मुरुगन अश्विन, राइली मेरिडिथ, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह.

बातम्या आणखी आहेत...