आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल 2022 मधील स्पर्धेतील 11 व्या सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) ने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) समोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना पंजाबने 8 गडी गमावून 180 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन (60) सर्वाधिक धावा करणारा ठरला. तर शिखर धवन (33) आणि जितेश शर्मा यांनी 26 धावा केल्या. CSKकडून ख्रिस जॉर्डन आणि ड्वेन प्रिटोरियसने प्रत्येकी 2 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने 18 षटकांत सर्व गडी गमावून 126 धावा केल्या. चेन्नईने 3 चेंडूत ऋतुराज गायकवाड (1) आणि रॉबिन उथप्पा (13) यांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर मोईन अली खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. अर्शदीपनेही कर्णधार जडेजाला खाते उघडू दिले नाही.
सामन्यातील काही खास क्षणे
सीएसकेचे दोन्ही सलामीवीर 3 चेंडूत बाद
लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली आणि संघाने 3 चेंडूत ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांच्या विकेट्स गमावल्या. दुसऱ्या षटकात कागिसो रबाडाच्या शेवटच्या चेंडूवर ऋतुराज 1 धावांवर बाद झाला. त्याचा झेल शिखर धवनने पहिल्या स्लिपमध्ये टिपला. यानंतर पुढच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वैभव अरोडने उथप्पाला (13) बाद केले.
पंजाबला मोठी धावसंख्या करता आली असती
पंजाबने पहिल्या 10 षटकात 3 गडी गमावून 109 धावा केल्या होत्या. संघ 200+ धावा करू शकेल असे वाटत होते, पण चेन्नईच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आणि केवळ धावांवरच अंकुश ठेवला नाही तर सतत विकेट्सही घेतल्या.
जॉर्डनने 24 धावांत घेतले 2 बळी
चेन्नई सुपर किंग्जकडून पहिला सामना खेळणाऱ्या ख्रिस जॉर्डनने 24 धावांत 2 बळी घेतले. त्याने शाहरुख खान (6) आणि ओडियन स्मिथ (3) यांना बाद करून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मेगा लिलावात सीएसकेने जॉर्डनला 3.60 कोटी रुपयांना विकत घेतले.
रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकली
पहिल्या दोन सामन्यांमध्ये सलग दोन नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार म्हणून रवींद्र जडेजाने आज आयपीएलमध्ये पहिली नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक मोठी चमक आणि हास्य होते.
धोनीचा 350 वा T20
एमएस धोनीचा हा 350 वा टी-20 सामना आहे. भारतासाठी 350 T20 सामने खेळणारा तो रोहित शर्मानंतर दुसरा भारतीय ठरला. टी-20 मध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम किरॉन पोलार्ड (583) च्या नावावर आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
PBKS: मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षे (विकेटकीपर), ओडियन स्मिथ, शाहरुख खान, वैभव अरोरा, जितेश शर्मा, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर.
CSK: ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, एमएस धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (क), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी, ख्रिस जॉर्डन.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.