आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • CSK Vs RCB 19th IPL Match LIVE Score; MS Dhoni Virat Kohli Devdutt Padikkal Maxwell Devilliers | Mumbai Wankhede Stadium News | Chennai Super Kings Vs Royal Challengers Bangalore IPL 2021 Live Cricket Score Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CSK vs RCB:चेन्नईकडून बंगळुरुचा 69 धावांनी पराभव, सीएसकेचा आरसीबीविरोधात मागील 11 सामन्यात 9व्यांदा विजय

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविंद्र जडेजाने 62 धावांच्या धडाकेबाज खेळीनंतर 3 विकेटदेखील घेतल्या

IPL 2021 सीजनचा 19वा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात चेन्नईने बंगळुरुला 69 धावांनी पराभूत केले. हा CSK चा RCB विरोधात मागील 11 सामन्यातील 9वा विजय आहे. या विजयासह चेन्नई गुणतालिकेत नंबर एकला पोहचली आहे. रविंद्र जडेजाने 28 बॉलमध्ये 62 धावांची खेळी केल्यानंतर 4 ओव्हरमध्ये 13 रन देऊन 3 विकेट घेतल्या.
सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

जडेजासोबतच, सीजनचा पहिला सामना खेळत असलेल्या इम्रान ताहिरने 4 ओव्हरमध्ये 16 रन देऊन 2 विकेट घेतल्या. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 191 रन काढले होते. प्रत्युत्तरात बंगळरुचा संघ 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 122 रन काढू शकला.

जडेजाने डिविलियर्स आणि मॅक्सवेलला आउट केले
जडेजाने एबी डिविलियर्स आणि ग्लेन मैक्सवेलला क्लीन बोल्ड केले. डिविलियर्स 9 बॉलमध्ये 4 आणि मॅक्सवेल 15 बॉलमध्ये 22 रन काढून आउट झाले. या दोघांशिवाय जडेजाने सुंदरची विकेट घेतली. तर, इम्रान ताहिरने काइल जेमिसन आणि हर्षल पटेलला आउट केले.

डुप्लेसिसने IPL मध्ये 18वे अर्धशतक केले

चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडे संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने 25 बॉलमध्ये 33 काढले. यानंतर, युजवेंद्र चहलने गायकवाडला काइल जेमिसनकडे झेलबाद केले. ऋतुराजने डुप्लेसिससोबत 74 धावांची ओपनिंग पार्टनरशिप केली. यानंतर, रैना आणि डुप्लेसिसदरम्यान, 27 बॉलमध्ये 37 रनांची पार्टनरशिप झाली. फापा डुप्लेसिसने 41 बॉलमध्ये 50 धावा करत आयपीएलमधले 18वे अर्धशतक लगावले.

रैनाचे IPL मध्ये 200 षटकार पूर्ण

सुरेश रैनाने IPL मध्ये 200 षटकार पूर्ण केले आहेत. 10व्या ओव्हरमध्ये चहलच्या बॉलवर षटकार मारुन ही कामगिरी केली. रैनापूर्वी रोहित शर्मा, एमएस धोनी आणि विराट कोहलीने दोनशे षटकार पूर्ण केल्या आहेत.

दोन्ही संघ:

चेन्नई : महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायडू, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, सैम करन, इमरान ताहिर, शार्दूल ठाकुर आणि दीपक चाहर.

बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्‍कल, एबी डिविलियर्स, ग्लेन मैक्सवेल, वॉशिंगटन सुंदर, डेनियल क्रिश्चियन, काइल जेमिसन, नवदीप सैनी, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.

बातम्या आणखी आहेत...