आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • CSK Vs RR 12th IPL Match LIVE Score; Sanju Samson MS Dhoni | Mumbai Wankhede Stadium News | Chennai Super Kings Vs Rajasthan Royals IPL 2021 Live Cricket Score Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेन्नईचा राजस्थानवर विजय:राजस्थान रॉयल्सवर 45 धावांनी मात; चेन्नईने जिंकला दुसरा सामना

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जडेजा आणि मोइनने 4 ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्या

मोईन अली (३/७), रवींद्र जडेजा (२/२८) अाणि सॅम कॅरनच्या (२/२४) शानदार गाेलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने साेमवारी अायपीएलमध्ये दुसरा विजय साजरा केला. धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने लीगमधील अापल्या तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनच्या राजस्थान राॅयल्सला पराभूत केले. चेन्नई टीमने ४५ धावांनी सामना जिंकला.प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपरकिंग्ज संघाने ९ गड्यांच्या माेबदल्यात राजस्थान टीमसमाेर विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात राजस्थान राॅयल्स संघाने ९ गडी गमावून १४३ धावांपर्यंत मजल मारली. राजस्थान संंघाकडून सलामीवीर जाेस बटलरने (४९) एकाकी झंुज दिली.

मात्र, त्याने ४९ धावांची खेळी केली. इतर फलंदाज फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवू शकले नाही. कर्णधार संजू सॅमसन (१), डेव्हिड मिलर (२), रियान पराग (३) हे स्वस्तात बाद झाले.तसेच राहुल तेवाटियाने २० धावांची खेळी केली. त्यामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला. संजू सॅमसनचाही माेठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला. त्याला सॅम कॅरनने झेलबाद केले. यासह चेन्नई टीमने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर धडक मारली. दुसरीकडे राजस्थान राॅयल्स संघाला लीगमध्ये दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईकडून जडेजा व कॅरनने प्रत्येकी दाेन, माेईन अलीने तीन, ब्राव्हाे अाणि शार्दूल ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतली.

धाेनीने उघडले खाते
१८ धावांची खेळीचेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धाेनीने अाता तिसऱ्या सामन्यातून अायपीएलमध्ये धावांचे खाते उघडले. त्याने साेमवारी राजस्थानविरुद्ध १८ धावांची खेळी केली. सलामी सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर धाेनीने एका सामन्यात फलंदाजी केली नाही. अाता तिसऱ्या सामन्यात त्याने धावांची खाते उघडले.

​​​​दोन्ही संघ

चेन्नई: महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोइन अली, रविंद्र जडेजा, सैम करन, ड्वेन ब्रावो, शार्दूल ठाकुर आणि दीपक चाहर.

राजस्थान: मनन वोहरा, संजू सॅमसन (कर्णधार), डेविड मिलर, जोस बटलर, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, चेतन सकारिया, जयदेव उनादकट, मुस्तफिजुर रहमान.

बातम्या आणखी आहेत...