आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा वाढदिवस. त्यानिमित्त सोशल मीडियावर चाहत्यांकडून अल्लू अर्जुनवर बर्थडेच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने आपल्या मुलीसोबतची एक पोस्ट शेअर करत अल्लू अर्जुन वाढदिवसाच्या पुष्पा स्टाईल शुभेच्छा दिल्या आहेत.
वॉर्नर साऊथच्या चित्रपटांचे पोस्टर शेअर करत असतो
वॉर्नर आपल्या सोशल मीडियावर साऊथच्या चित्रपट आणि गाण्यांबद्दलच्या पोस्ट नेहमी शेअर करत असतो. अशातच अल्लू अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापासून वॉर्नर कसा मागे राहू शकतो. वॉर्नर आणि त्याची धाकटी मुलगी दोघांनी मिळून अल्लू अर्जुनला त्याच्या वाढदिवसानिमित्त पुष्पा चित्रपटातील 'झुकेगा नही साला' स्टाईलमध्ये शुभेच्छा दिला. त्याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांनी डेव्हिड आणि त्याच्या मुलीचे कौतुक केले आहे.
अल्लूने 'पुष्पा-2' चा टीझर केला लॉंच
आपल्या वाढदिवसानिमित्त अल्लू अर्जुनने पुष्पाच्या दुसऱ्या भागाचा टीझरही लाँच केला होता. जो चाहत्यांना खूप आवडला आहे. यातील अल्लू अर्जुनच्या वेगळ्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
हे ही वाचा
हॅप्पी बर्थ डे पुष्पा : अल्लू अर्जुनचे 100 कोटींचे घर, 7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन; पुष्पा-2 साठी घेतले सर्वाधिक 125 कोटी मानधन
'पुष्पा राज… मैं झुकेगा नहीं साला'. या डायलॉग आणि चित्रपटाने पॅन इंडिया स्टारचा किताब पटकावणाऱ्या अल्लू अर्जुनचा आज 41 वा वाढदिवस आहे. फिल्मी कुटुंबात जन्मलेला अल्लू सुपरस्टार राम चरणचा चुलत भाऊ आहे. लहानपणापासूनच फिल्मी वातावरणात असलेला अल्लू वयाच्या 3 ऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपटात आला. - येथे वाचा संपूर्ण स्टोरी
पुष्पा जिंदा है...:8 गोळ्या लागल्यानंतरही पुष्पा जिवंत, अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चा धमाकेदार व्हिडिओ रिलीज
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी चाहत्यांना एक मोठे सरप्राइज मिळाले आहे. त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2'चा खास व्हिडिओ आज रिलीज करण्यात आला आहे. 3 मिनिटांचा हा व्हिडिओ चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा आहे. अखेर पुष्पा जिवंत आहे, हे या व्हि़डिओतून स्पष्ट झाले आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.