आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली IPL बाहेर, पंजाबने 31 धावांनी हरवले:डेव्हिड वॉर्नरची फिफ्टी, हरप्रीत ब्रारच्या 4, एलिस-चहरच्या 2-2 विकेट

दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल-16 मधील 59 व्या सामन्यात पंजाब किंग्सने (PBKS) दिल्ली कॅपिटल्सवर (DC) 31 धावांनी विजय मिळवला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात पंजाबने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 20 षटकांत 8 गडी गमावून 136 धावाच करता आल्या.

वॉर्नरची फिफ्टी, ब्रारच्या 4 विकेट

दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 54 धावा केल्या. त्यानंतर फिलिप सॉल्टने 21, अमन खान व प्रवीण दुबेने प्रत्येकी 16 धावा केल्या. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने 4 विकेट घेतल्या. तर राहुल चहर आणि नॅथन एलिसने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तत्पूर्वी दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

दिल्लीचा डाव

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 7 गडी गमावून 167 धावा करत दिल्लीला विजयासाठी 168 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला ओपनर फिलिप सॉल्ट आणि डेव्हिड वॉर्नरने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी केली. सातव्या षटकात सॉल्टला 21 धावांवर बाद करत हरप्रीत ब्रारने ही जोडी फोडली. त्यानंतर राहुल चहरने पुढच्याच षटकात मिशेल मार्शला 3 धावांवर बाद केले. तर पुढच्याच षटकात हरप्रीत ब्रारने रिले रुसोला 5 धावांवर बाद करत दुसरी विकेट घेतली. त्यानंतर ब्रारने अर्धशतकी खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरलाही त्याच षटकात बाद केले. वॉर्नरने 54 धावा केल्या. यानंतर दहाव्या षटकात राहुल चहने अक्षर पटेलला 1 धावेवर बाद केले. तर अकराव्या षटकात ब्रारने मनीष पांडेला शून्यावर बाद करत चौथी विकेट घेतली. त्यानंतर नॅथन एलिसने ​​​​​​​सोळाव्या षटकात अमन खानला 16 धावांवर तर अठराव्या षटकात प्रवीण दुबेलाही 16 धावांवर बाद केले. कुलदीप यादव आणि मुकेश कुमारने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाची धावसंख्या 136 वर नेली.

पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड

अशा पडल्या दिल्लीच्या विकेट

  • पहिलीः सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हरप्रीत ब्रारने फिलिप सॉल्टला बोल्ड केले.
  • दुसरीः आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राहुल चहरने मिशेल मार्शला पायचित केले.
  • तिसरीः नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हरप्रीत ब्रारने रिले रुसोला सिकंदर रझाच्या हाती झेलबाद केले.
  • चौथीः नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हरप्रीत ब्रारने डेव्हिड वॉर्नरला पायचित केले.
  • पाचवीः दहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर राहुल चहरने अक्षर पटेलला पायचित केले.
  • सहावीः अकराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हरप्रीत ब्रारने मनीष पांडेला बोल्ड केले.
  • सातवीः सोळाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नॅथन एलिसने अमन खानला हरप्रीत ब्रारच्या हाती झेलबाद केले.
  • आठवीः अठराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नॅथन एलिसने प्रवीण दुबेला बोल्ड केले.

प्रभसिमरचे शतक

पंजाबकडून प्रभसिमरन सिंहने सर्वाधिक 103 धावा केल्या. त्यानंतर सॅम करनने 20, सिकंदर रझाने 11 धावा केल्या. दिल्लीकडून ईशांत शर्माने 2, तर अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव आणि मुकेश कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

पंजाबचा डाव

प्रथम फलंदाजी करताना पंजाबची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर शिखर धवन दुसऱ्याच षटकात 7 धावांवर बाद झाला. ईशांत शर्माने त्याची विकेट घेतली. त्यानंतर ईशांतने पाचव्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोनलाही 4 धावांवर बाद केले. तर पुढच्याच षटकात अक्षर पटेलने जितेश शर्माला 5 धावांवर बाद केले. त्यानंतर प्रभसिमरन सिंह आणि सॅम करनने डाव सावरत चौथ्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी केली. पंधराव्या षटकात सॅम करनला 20 धावांवर बाद करत प्रवीण दुबेने ही जोडी फोडली. यानंतर कुलदीप यादवने सतराव्या षटकात हरप्रीत ब्रारला 2 धावांवर बाद केले. तर शतकी खेळी करत पंजाबच्या डावाला आकार देणाऱ्या प्रभसिमरन सिंहला मुकेश कुमारने एकोणिसाव्या षटकात 103 धावांवर बाद केले. यानंतर शेवटच्या षटकात शाहरुख खान 2 धावांवर धावबाद झाला. सिकंदर रझा आणि ऋषी धवनने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाची धावसंख्या 167 वर नेली.

अशा पडल्या पंजाबच्या विकेट

  • पहिलीः दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ईशांत शर्माने शिखर धवनला रिले रुसोच्या हाती झेलबाद केले.
  • दुसरीः पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ईशांत शर्माने लियाम लिव्हिंगस्टोनला बोल्ड केले.
  • तिसरीः सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अक्षर पटेलने जितेश शर्माला बोल्ड केले.
  • चौथीः पंधराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर प्रवीण दुबेने सॅम करनला अमन खानच्या हाती झेलबाद केले.
  • पाचवीः सतराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुलदीप यादवने हरप्रीत ब्रारला मिशेल मार्शच्या हाती झेलबाद केले.
  • सहावीः एकोणिसाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मुकेश कुमारने प्रभसिमरन सिंहला बोल्ड केले.
  • सातवीः विसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शाहरुख खान धावबाद झाला.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11...

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वार्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, रिले रूसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

इम्पॅक्ट प्लेयर्स - मनीष पांडे, रिपल पटेल, ललित यादव, चेतन सकारिया, अभिषेक पोरेल​​​

​​​​पंजाब किंग्स: शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, सिकंदर रझा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषि धवन, राहुल चहर आणि अर्शदीप सिंह.

इम्पॅक्ट प्लेयर्स - नॅथन एलिस, अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंह भाटिया, मोहित राठी

दिल्ली पॉइंट टेबलमध्ये सर्वात खाली

दिल्लीने चालू हंगामात आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये ते केवळ चारच जिंकू शकले आहेत, तर संघाने 7 सामने गमावला आहे. 10 संघांच्या गुणतालिकेत संघ 8 गुणांसह सर्वात खाली आहे.

हैदराबादविरुद्ध संघाचे 4 विदेशी खेळाडू डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, मिचेल मार्श आणि रिले रुसो असू शकतात. याशिवाय इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे खेळाडू संघाला ताकद देत आहेत.

पंजाब संघाने 11 पैकी 5 सामने जिंकले
पंजाबने चालू हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. संघाचे सध्या 10 गुण आहेत. दिल्लीविरुद्धच्या संघाचे चार विदेशी खेळाडू नॅथन एलिस, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन असू शकतात. याशिवाय शिखर धवन, प्रभसिमरन सिंग आणि अर्शदीप सिंग यांसारख्या बड्या खेळाडूंचा संघात समावेश आहे.

दोन्ही संघ हेड टू हेड बरोबरीत
दिल्ली आणि पंजाब यांच्यात आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये दोन्ही संघांनी 15-15 सामने जिंकले.