आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • DC Vs PUNJAB 11th IPL Match LIVE Score; Rishabh Pant KL Rahul Chris Gayle | Mumbai Wankhede Stadium News | Delhi Capitals Vs Punjab Kings IPL 2021 Live Cricket Score Latest News Update

DC vs PUNJAB:शिखर धवनच्या झंझावाती 92 धावा; दिल्लीची पंजाबवर सहा गड्यांनी मात

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऋषभच्या नेतृत्वात दिल्लीचा दुसरा विजय; पंजाबने गमावला दुसरा सामना

सलामीवीर पृथ्वी शाॅ (३२) आणि शिखर धवनच्या (९२) तुफानी खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने रविवारी आयपीएलमध्ये पंजाब किंग्जला पराभूत केले. ऋषभ पंतच्या दिल्ली संघाने ६ गड्यांनी सामना जिंकला. यासह दिल्लीने स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नाेंद आपल्या नावे केली. यातून दिल्लीने गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले. लाेकेश राहुलच्या पंजाब किंग्ज संघाला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघाने चार गड्यांच्या माेबदल्यात १८.2 षटकांत विजयश्री खेचून आणली. संघाच्या विजयामध्ये मधल्या फळीतल्या स्टाेइनिस (नाबाद २७) आणि ललित यादवने (नाबाद १२) यांनीही माेेलाचे याेगदान दिले. कर्णधार ऋषभ पंतने १५ धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्ली संघाला झटपट आपला दुसरा विजय साकारता आला. गाेलंदाजीत पंजाब किंग्ज संघाकडून रिचर्ड््सनने दाेन, अर्शदीप व मेरेडिथने प्रत्येकी एक विकेट घेतली.

लाेकेश-मयंकची भागीदारी व्यर्थ : पंजाब संघाकडून कर्णधार आणि सलामीवीर लाेकेश राहुल-मयंक अग्रवालने दमदार सुरुवात केली. त्यांनी १२२ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. यादरम्यान दाेघांनी वैयक्तिक अर्धशतके साजरी केली. मात्र, त्यांना आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. लाेकेशने ६१ व मयंकने ६९ धावांची खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...