आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज शनिवारी मुंबई इंडियन्सशी सामना करणार आहे. यासाठी टीम मुंबईत पोहोचली आहे. विमानतळाच्या प्रवासादरम्यान संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरवर एक खास काम सोपवण्यात आले होते. त्याला एक ट्रॅव्हल ब्लॉग बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यासाठी त्याला सहकारी खेळाडूंशीही बोलायचे होते.
मुंबईविरुद्धच्या सामन्याची रणनीती आणि नियोजन याबाबत दीपकला सहकाऱ्यांशी बोलायचे होते. मुंबईत कसे खेळायचे हे जाणून घेण्याचा त्याने यात प्रयत्न केला. अजिंक्य रहाणे मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो, त्याने खेळपट्टीची चांगली माहिती दिली. पण यासोबतच काही खेळाडूंनी चहरची खिल्लीही उडवली.
चहरने अंबाती रायडूशी हँडशेक केल्यावर त्याने 'छुट्टे नहीं है' म्हणत त्याला पुढे हाकलले. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनीनेही विमानात चहरकडे दुर्लक्ष केले. खरे तर चहर जेव्हा धोनीकडे कॅमेरा घेऊन पोहोचला तेव्हा तो एक पुस्तक वाचत होता. चहरला त्याच्याशी बोलायचे होते तेव्हा त्याने हाताचा इशारा करून त्याला पुढे जाण्यास सांगितले. धोनीने चहरकडे ढुंकूनही पाहिले नाही. चहर म्हणाला- 'माही भाई उत्तर द्या... कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात.' मात्र, धोनीने कोणतेही उत्तर दिले नाही. हा संपूर्ण व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांना तो खूप आवडला आहे.
चेन्नई संघाने आतापर्यंत एक सामना गमावला असून एक सामना जिंकला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या मोसमातील पहिल्या सामन्यात त्याचा पराभव झाला आणि त्यानंतर त्याने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करून खाते उघडले. यानंतर तिसऱ्या सामन्यासाठी संघ मुंबईत पोहोचला आहे. येथे त्यांचा सामना पाच वेळच्या चॅम्पियन संघाशी होणार आहे. गेल्या दोन हंगामांत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी चांगली राहिलेली नाही. या मोसमातही त्याला पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.
दुसरीकडे, चहरच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध संघाने 12 धावांनी विजय मिळवला असला, तरी त्याने चार षटकांत 55 धावा दिल्या. चहरला अद्याप नवीन चेंडूसह चेन्नईसाठी लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही. नवीन चेंडूवर मिळालेल्या स्विंगने त्याने चेन्नईला सातत्याने यश मिळवून दिले आहे, पण दुखापतीतून सावरल्यानंतरही त्याला त्याची जुनी लय अद्याप गवसलेली नाही.
चेन्नईवर मुंबई टीम नेहमीच वरचढ
CSK आणि MI संघ सर्वात यशस्वी IPL संघ आहेत. मुंबई पाच वेळा तर चेन्नई चार वेळा चॅम्पियन आहे. या स्पर्धेत आतापर्यंत दोघांमध्ये सर्वाधिक 34 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये मुंबईने 20 वेळा तर चेन्नईने 14 वेळा विजय मिळवला आहे.
खेळपट्टीचा अहवाल वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त ठरली आहे. येथे, देशांतर्गत, आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय सर्व सामन्यांमध्ये जोरदार धावा केल्या जातात.
हवामानाची स्थिती सामन्याच्या दिवशी मुंबईतील हवामान उबदार राहण्याची शक्यता आहे. मुंबईत शनिवारी तापमान 27 ते 36 अंश सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता नाही.
दोन्ही संघातील संभाव्य प्लेयर्स
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सिसांडा मगला/ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर आणि राजवर्धन हंगरगेकर.
इम्पॅक्टफूल प्लेयर : अजिंक्य रहाणे, प्रशांत सोळंकी, तुषार देशपांडे, सिमरजित सिंग.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, जेसन बेहरेनडॉर्फ, जोफ्रा आर्चर, अर्शद खान, पियुष चावला.
इम्पॅक्टफूल प्लेयर : हृतिक शोकीन, विष्णू विनोद, शम्स मुलाणी, संदीप वॉरियर.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.