आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज GT Vs DC ची टक्कर:दोन्ही संघांच्या अष्टपैलू खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळे ज्यांची टॉप ऑर्डर चांगली असेल, त्यांच्या पारड्यात डाव पडण्याची शक्यता

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आजच्या डबल हेडरमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता आमनेसामने असतील. आयपीएल 2022 च्या पहिल्या आठवड्यात आपण मनोरंजक सामने पाहिले. सीझनमधील 10व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. एका बाजूला गुजरात आहे ज्याने पदार्पणाच्या सामन्यात लखनऊचा 5 विकेट्सने पराभव केला. दुसरीकडे DC आहेत, ज्यांनी MI ला 4 गडी राखून पराभूत करून हंगामाची सुरुवात केली. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (MCA), पुणे येथे होणार आहे.

दोन्ही संघांच्या फलंदाजीवर असेल लक्ष
दिल्ली कॅपिटल्स संघ 2013 मध्ये स्थापन झाल्यापासून सातत्याने आपल्या कामगिरीत सुधारणा करत आहे. डेव्हिड वॉर्नरचा संघात समावेश केल्याने त्यांच्या फलंदाजीला अधिक बळ मिळणार आहे. टायटन्सची फलंदाजी हा चिंतेचा विषय ठरला आहे आणि त्यांची टॉप ऑर्डर अपेक्षा पूर्ण करु शकली नाही. आजच्या सामन्यात फलंदाज दिल्लीविरुद्ध चांगले खेळतात हा हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

फलंदाजीत अव्वल दर्जाची कामगिरी नसतानाही, हार्दिक पंड्या संघाच्या पदार्पणाच्या सामन्याच्या निकालाने खूश होता कारण त्याच्या संघाने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध विजय नोंदवला. खरे तर एक सोपे धावांचे आव्हान गुजरातने अवघड केले होते. पंड्याला दिल्ली कॅपिटल्सची फायर पावर चांगली माहिती आहे आणि अशा परिस्थितीत तो आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूकडून चांगल्या खेळाची अपेक्षा करेल.

एमसीए स्टेडियमशी संबंधित माहिती
पुण्यातील MCA स्टेडियमने आतापर्यंत 39 आयपीएल सामने आयोजित केले आहेत. पुणे वॉरियर्स इंडिया आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांच्या घरच्या सामन्यांव्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जचे काही सामने देखील या स्टेडियममध्ये खेळले गेले आहेत. या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना येथे खेळला गेला होता, ज्यामध्ये राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 210 धावा केल्या आणि 61 धावांनी सामना जिंकला. आज कोणता संघ नाणेफेक जिंकेल, दव लक्षात ठेऊन साहजिकच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतील.

गुजरातच्या फलंदाजी क्रमवारीत होऊ शकतात बदल
शुबमन गिल, ज्याच्याकडे गुजरातने खूप अपेक्षा ठेवल्या आहेत, तो पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. तिसर्‍या क्रमांकावर विजय शंकरला मैदानात उतरवणेही संघाच्या हिताचे राहिलेले नाही. शुभमन गिल आणि विजय शंकर यांच्या अपयशामुळे संपूर्ण फलंदाजी दडपणाखाली आली. डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया आणि अभिनव मनोहर यांच्या रूपाने संघाचा मिडिल ऑर्डर चांगली दिसते. अशा स्थितीत संघ व्यवस्थापन विजय शंकरच्या फलंदाजीच्या क्रमात बदल करण्याचा विचार करू शकते.

गोलंदाजीत शमीसह राशिद गेम चेंजर ठरू शकतो
शेवटच्या गेममध्ये मोहम्मद शमी बॉलिंगसह चांगली कामगिरी करत होता. पण त्याला वरुण अॅरॉनकडून अपेक्षित साथ मिळू शकली नाही. डेथ ओव्हर्समध्ये गुजरातची गोलंदाजी रुळावरून घसरताना दिसली. वरुणने 2 विकेट घेतल्या, पण लखनऊविरुद्ध अचूक टिप्पा पकडण्यात त्याने चूक केली.

दिल्लीची बॅटिंग लाइनअप खूप मजबूत असली तरीही रशीद खानकडे विकेट घेण्याची क्षमता आहे. शमीसह रशीदची कामगिरी या सामन्यात निर्णायक ठरू शकते. पंड्या आणि लॉकी फर्ग्युसन यांच्याकडे भरपूर अनुभव असून त्याचा त्यांना या सामन्यात चांगला उपयोग करावा लागणार आहे.

अष्टपैलूंचा सामना होईल
ललित यादवच्या नाबाद 48 आणि पटेलच्या नाबाद 38 धावांच्या जोरावर दिल्लीने पहिल्या सामन्यात मुंबईवर मात केली होती. दुसरीकडे, राहुल तेवतियाने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 40 धावा करत लखनऊविरुद्ध पहिला विजय मिळवला होता. आजच्या सामन्यात ज्याचा अष्टपैलू खेळाडू चांगली कामगिरी करेल, तो संघ सामन्यात दोन पावले पुढे असेल.

बातम्या आणखी आहेत...