आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आयपीएलमधील लीग स्टेजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) दिल्ली कॅपिटल्सला (DC) 6 गड्यांनी हरवले. दिल्लीने दिलेले 173 धावांचे आव्हान मुंबईने 4 गडी गमावून 20 षटकांत पूर्ण केले. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक 65, तिलक वर्माने 41, ईशान किशनने 31 तर कॅमेरून ग्रीनने 17 व टिम डेव्हिडने 13 धावा केल्या.
दिल्लीकडून मुकेश कुमारने 2 तर मुस्तफिझुर रहमानने 1 विकेट घेतली.
पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड
मुंबईचा डाव
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीने 19.4 षटकांत सर्व गडी बाद 172 धावा करत मुंबईसमोर 173 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा सामना करण्यासाठी मैदानावर आलेल्या मुंबईला ओपनर रोहित शर्मा आणि ईशान किशनने वेगवान सुरूवात मिळवून दिली. दोघांनी पॉवर प्लेमध्ये 68 धावांची नाबाद भागीदारी केली. दोघांची दमदार खेळी सुरू असतानाच आठव्या षटकात ईशान किशन धावबाद झाला. त्याने 31 धावा केल्या. ईशान आणि रोहितने पहिल्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली. यानंतर रोहितने तिलक वर्मासह संघाचा डाव सावरला. रोहितने संयमी अर्धशतक पूर्ण केले. तर तिलक वर्माने फटकेबाजी करत धावसंख्या पुढ नेली. मात्र 16 व्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर मुकेश कुमारने तिलकला मनीष पांडेच्या हाती झेलबाद केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर मुकेशने सूर्यकुमारलाही शून्यावरच झेलबाद केले. यानंतर रोहित शर्माने टिम डेव्हिडसह संघाचा डाव पुढे नेला. पण पुढच्याच षटकात तो झेलबाद झाला. यानंतर कॅमेरून ग्रीनने फटकेबाजी करत संघाचा विजय दृष्टीक्षेपात आणला आणि शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना टिम डेव्हिडने टोलवलेल्या चेंडूवर दोघांनी वेगवान दोन धावा घेतल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.
2021 नंतर रोहितचे अर्धशतक
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने IPL मध्ये 808 दिवसांनंतर अर्धशतक केले. त्याने याआधी 23 एप्रिल 2021 रोजी पंजाब किंग्सविरोधात 52 चेंडूंत 63 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहितने 25 डावांत फलंदाजी केली. मात्र एकदाही त्याला 50 पेक्षा जास्त धावा करता आल्या नव्हत्या.
मुंबईच्या ओपनर्सची वेगवान सुरूवात
मुंबईला ओपनर रोहित शर्मा आणि ईशान किशनने वेगवान सुरूवात मिळवून दिली. दोघांनी पॉवर प्लेमध्ये 68 धावांची नाबाद भागीदारी केली. दोघांची दमदार खेळी सुरू असतानाच आठव्या षटकात ईशान किशन धावबाद झाला. त्याने 31 धावा केल्या. ईशान आणि रोहितने पहिल्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली.
अशा पडल्या मुंबईच्या विकेट
दिल्लीकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 54, वॉर्नरने 51, मनीष पांडेने 26 व पृथ्वी शॉने 15 धावा केल्या. मुंबईकडून जेसन बेहरनडॉर्फ व पीयूष चावलाने प्रत्येकी 3 तर रिले मेरेडिथने 2 विकेट घेतल्या. ऋतिक शौकिनने 1 विकेट घेतली. कुलदीप यादवला निहाल वढेराने धावबाद केले.
दिल्लीचा डाव
दिल्लीची चौथ्या षटकातच पहिली विकेट पडली. दिल्लीचा ओपनर पृथ्वी शॉ 15 धावांवर बाद झाला. शौकिनने त्याची विकेट घेतली. नंतर वॉर्नरने मनीष पांडेसह डाव पुढ नेला. पण तो 26 धावा करून बाद झाला. पीयूष चावलाने त्याची विकेट घेतली. नंतर आलेल्या यश धुलची विकेट रिले मेरेडिथने घेतली. नंतर पीयूष चावलाने पॉवेल आणि ललित यादवला बाद केल्याने दिल्लीचा डाव अडचणीत सापडला. नंतर वॉर्नरने अक्षर पडेलसह संघाची धावसंख्या पुढे नेली. अक्षरने 22 चेंडूंत वेगवान अर्धशतक ठोकले. मात्र 19 व्या षटकात बेहरनडॉर्फने त्याची विकेट घेतली. त्याने 54 धावा केल्या. नंतर बेहरनडॉर्फने वॉर्नरलाही 51 धावांवर झेलबाद केले. तर नंतर आलेला कुलदीप यादवही त्याच्याच षटकात धावबाद झाला. तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बेहरनडॉर्फने अभिषेक पोरेललाही झेलबाद केले.
वॉर्नरचे स्लो अर्धशतक
दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मुंबईविरोधातही अर्धशतक केले. मात्र हे अर्धशतक खूप स्लो होते. त्याने 43 चेंडूंत अर्धशतक केले. हे त्याचे आयपीएलमधील 58 वे अर्धशतक आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक त्याच्याच नावे आहेत.
अशा पडल्या दिल्लीच्या विकेट
पॉवर प्लेमध्ये दिल्लीची सावध सुरुवात
टॉस हरल्यावर प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीला ओपनर डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉने वेगवान सुरूवात मिळवून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. शॉ 10 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. नंतर वॉर्नरने मनीष पांडेसह डाव पुढे नेला आणि 6 षटकांत 51 धावा केल्या.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11...
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हि वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, एनरिक नॉर्त्या आणि मुस्तफिजुर रहमान.
इम्पॅक्ट प्लेयर: मुकेश कुमार, अमन खान, सरफराज खान, इशांत शर्मा.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, अर्शद खान, ऋतिक शौकिन, पीयूष चावला, जेसन बेहरनडाॅर्फ आणि रिले मेरिडिथ.
इम्पॅक्ट प्लेयर्स: ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, कुमार कार्तिकेय आणि रमनदीप सिंह.
दिल्लीला या हंगामातील पहिल्या विजयाची अपेक्षा
या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झालीच नाही. त्याला सुरुवातीच्या तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघ पहिल्या विजयाच्या शोधात आहे. पहिल्या सामन्यात लखनऊने 50 धावांनी, दुसऱ्या सामन्यात गुजरातचा 6 गडी राखून आणि तिसऱ्या सामन्यात राजस्थानचा 57 धावांनी पराभव केला होता.
मुंबईविरुद्ध संघाचे चार परदेशी खेळाडू डेव्हिड वॉर्नर, रोव्हमन पॉवेल, रिले रुसो आणि अॅनरिक नॉर्टया असू शकतात. याशिवाय अक्षर पटेल, मनीष पांडे आणि कुलदीप यादव हेही संघाला पूर्ण पाठिंबा देत आहेत.
पहिल्या दोन सामन्यात मुंबईचा पराभव
दुसरीकडे, भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघालाही पहिल्या दोन सामन्यात एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. त्याने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून 8 विकेट्सने पराभूत केले होते आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने शेवटच्या सामन्यात सात गडी राखून पराभूत केले होते.
दिल्लीविरुद्ध संघाचे चार परदेशी खेळाडू कॅमेरॉन ग्रीन, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड आणि जेसन बेहरेनडॉर्फ असू शकतात. याशिवाय रोहित शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव हेही संघाला मजबूत करत आहेत.
दिल्लीवर मुंबईचा संघ नेहमीच वरचढ
आयपीएलच्या या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. पण, दोन्ही संघांमधील आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांच्या आधारे, जर आपण हेड टू हेडबद्दल विचार केला तर दोघेही एकूण 32 सामन्यांमध्ये भिडले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने 17 सामने जिंकले आहेत, तर दिल्लीने एकूण 15 सामने जिंकले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.