आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल २०२२ च्या ६४ व्या सामन्यात सोमवारी दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा १७ धावांनी पराभव केला. दिल्लीचा यंदाच्या सत्रातील १३ सामन्यांमधील हा सातवा विजय ठरला. पंजाबचा पराभव करून दिल्लीने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्याचबरोबर पंजाब किंग्जचा १३ सामन्यांमधला हा सातवा पराभव आहे. या पराभवामुळे अव्वल चारमध्ये येण्याचे त्याचे स्वप्न भंगले आहे. दिल्लीच्या विजयाने बंगळुरूचे नुकसान झाले, तो चौथ्यावरून पाचव्या स्थान घसरला. दिल्लीने गुणतालिकेत चौथा क्रमांक गाठला.
नाणेफेक जिंकून पंजाबने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने पंजाबसमोर ७ बाद १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. मार्शने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब २० षटकांत ९ गडी बाद १४२ धावा करू शकला. पंजाबच्या जितेश शर्माने एकाकी लढत ते ३४ चेंडूंत सर्वाधिक ४४ धावा काढल्या बेयरस्टोने २८, धवनने १९, राहुल चाहरने नाबाद २५ धावांचे योगदान दिले. दिल्लीच्या शार्दूल ठाकूरने ३६ धावा देत ४ फलंदाज तंबूत पाठवले. कुलदीप यादवने २ आणि एनरिच नोर्तजने एक गडी बाद केला.
मिचेल मार्शची अर्धशतकी खेळी
दिल्लीच्या मिचेल मार्श पुन्हा एकदा शानदार अर्धशतक झळकावत संघाच्या विजयाचा हीरो ठरला. त्याने ४८ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार खेचत ६३ धावा ठोकल्या. सरफराज व मार्शने दुसऱ्या गड्यासाठी ५१ धावांची भागीदारी रचली. सरफराज खानने ३२, ललित यादवने २४, अक्षर पटेलने १७ धावा जोडल्या. पंजबाच्या लिम लिव्हिंगस्टोन आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी तीन गडी बाद केले. कगिसो रबाडाने एकाला टिपले.
धावफलक, नाणेफेक पंजाब किंग्ज (गोलंदाजी) दिल्ली कॅपिटल्स धावा चेंडू ४ ६ वॉर्नर झे. चाहर गो. लिव्हिंगस्टोन ० १ ० ० सरफराज झे. चाहर गो. अर्शदीप ३२ १६ ५ १ मार्श झे. धवन गो. रबाडा ६३ ४८ ४ ३ ललित झे. भानुका गो. अर्शदीप २४ २१ १ १ पंत यष्टी शर्मा गो. लिव्हिंगस्टोन ७ ३ ० १ अक्षर पटेल नाबाद १७ २० २ ० शार्दूल झे. बरार गो. अर्शदीप ३ ४ ० ० कुलदीप यादव नाबाद २ २ ० ० अवांतर : ९, एकूण : २० षटकांत ७ बाद १५९ धावा.गोलंदाजी : लिम लिव्हिंगस्टोन ४-०-२७-३, कागिसो रबाडा ३-०-२४-१, हरप्रीत बरार ३-०-२९-०,, रिशी धवन २-०-१७-०, अर्शदीप सिंग ४-०-३७-३, राहुल चाहर ४-०-१९-०. पंजाब किंग्ज धावा चेंडू ४ ६ बेयरस्टो झे. पटेल गो. नोर्तजे २८ १५ ४ १ धवन झे. पंत गो. ठाकूर १९ १६ ३ ० भानुका झे. नोर्तजे झे. ठाकूर ४ ५ १ ० लिव्हिंगस्टोन झे. पंत गो. कुलदीप ३ ५ ० ० शर्मा झे. वॉर्नर गो. ठाकूर ४४ ३४ ३ २ हरप्रीत त्रि. गो. कुलदीप यादव १ २ ० ० रिशी त्रि. गो. पटेल ४ १३ ० ० राहुल चाहर नाबाद २५ २४ २ १ रबाडा झे. पॉवेल गो. ठाकूर ६ २ ० १ अर्शदीप सिंग नाबाद २ ३ ० ० अवांतर : ६, एकूण : २० षटकांत ९ बाद १४२ धावा. गोलंदाजी : खलील अहमद ४-०-४३-०, एनरिच नोर्तजे ४-०-२९-१, ललित यादव १-०-६-०, शार्दूल ठाकूर ४-०-३६-४, अक्षर पटेल ४-०-१४-२, कुलदीप यादव ३-०-१४-२.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.