आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल 2022:दिल्लीची नजर टॉप-4 वर; आठव्या विजयासाठी राजस्थान संघ सज्ज! राजस्थान 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएलमध्ये सहावा विजय संपादन करण्यासाठी उत्सुक आहे. या विजयासह दिल्ली संघाला गुणतालिकेतील टॉप-४ मधील आपले स्थान निश्चित करता येणार आहे. यासाठी दिल्ली संघाला बुधवारी संजू सॅमसनच्या राजस्थान राॅयल्सच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. हे दोन्ही संघ मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर आज समोरासमोर असतील. या दोन्ही संघांमध्ये यंदाच्या सत्रातील दुसरा सामना होणार आहे. राजस्थान संघाने २२ एप्रिल रोजी पहिल्या सामन्यात दिल्लीचा १५ धावांनी पराभव केला होता.

आता हीच पराभवाची परतफेड करण्यासाठी दिल्ली संघाने कंबर कसली आहे. दिल्ली संघ पाच विजयासह गुणतालिकेतमध्ये पाचव्या स्थानी आहे. राजस्थानने सात विजयासह टॉप-४ मध्ये तिसरे स्थान गाठलेले आहे. आता राजस्थान नवव्या विजयासह टॉप-४ मधील स्थान कायम ठेवण्यासाठी उत्सुक आहे.

बातम्या आणखी आहेत...