आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलच्या 14 व्या सत्रावर कोरोना महामारीचे संकट येतांना दिसत आहे. कारण आयपीएल सुरु होण्यापूर्वीच तीन खेळाडू कोरोनाबाधीत झाले आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) सलामवीर खेळाडू देवदत्त पडिक्कलदेखील पॉझिटिव्ह आला आहे. तो सध्याला क्वारंटाईन असून त्याला (RCB) स्कॉडमधून वेगळे करण्यात आले आहे. परंतु, बीसीसीआय आणि बँगलोर संघाकडून याची आतापर्यंत पुष्टी करण्यात आली नसल्याचे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकारीने सांगितले.
यापूर्वी (DC) संघातील अक्षर पटेल आणि कोलकता नाइट रायडर्सचा खेळाडू नीतीश राणादेखील पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, आतापर्यंत स्टाफ आणि खेळाडू मिळून 20 लोक कोरोनाबाधीत आढळले होते. दुसरीकडे, शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील 10 कर्मचारी आणि 6 इव्हेंट मॅनेजर पॉझिटिव्ह आले होते.
KKR चा नीतीश राणा कोरोनाबाधीत झाला होता
इंडियन प्रीमियर लीग (IPL) वर कोरोनाचे सावट आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा खेळाडू नितीश राणाला 14 वा सीजन सुरू होण्याच्या 8 दिवस आधीच कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गोव्यातील सुट्टीनंतर राणा संघात दाखल झाला. त्यांचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला, परंतु BCCI आणि KKR कडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश मुंबईतील टीम हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली तो आहे. आयपीएलचा 14 वा सीजन 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. अंतिम सामना 30 मे रोजी होईल. पहिला सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात खेळला जाणार आहे. केकेआरचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबादशी 11 मार्चला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.