आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्डकप:टीम इंडिया-बांगलादेश संघासाठी 'करा वा मरा'ची स्थिती, आज दुपारी सामना

अॅडिलेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघ आता टी-२० विश्वचषकातील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया आणि बांगलादेश संघांत बुधवारी सामना रंगणार आहे. दाेन्ही संघांसाठी अॅडिलेडच्या मैदानावर हाेणारा हा सामना करा वा मरा आहे. त्यामुळे भारतीय संघ आता या शेवटच्या संधीत विजय संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. टीम इंडियाला गत सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्कारावा लागला. याच पराभवाने टीम इंडियाची पुढची वाट खडतर झाली.भारतीय संघ सध्या ब गटामध्ये चार गुण आणि ०.८४४ नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या तीन सामन्यांमध्ये दाेन विजय आणि एक पराभव नाेंद आहे. त्यापाठाेपाठ बांगलादेश संघाचेही चार गुण आहेत. यासह हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, बांगलादेश संघाची नेट रनरेटमध्ये मजबुत स्थिती आहे. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यामध्ये विजय आवश्यक आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत टी-२० विश्वचषकात चार सामने झाले आहेत. या चारही सामन्यांमध्ये भारताला विजय संपादन करता आला आहे.

भारतीय संघ आणि राेहित शर्माला बांगलादेश टीमविरुद्ध आतापर्यंत सर्वाेत्तम खेळीतून वर्चस्व राखता आले आहे. भारताने या संघाविरुद्ध आेव्हरऑल ११ सामन्यांमध्ये १० विजय संपादन केेले. तसेच राेहितने या संघांविरुद्ध ११ सामन्यांमध्ये १४४.४० च्या स्ट्राइक रेटने ४५२ धावा काढल्या आहेत. त्यामुळे या संघाविरुद्ध ताे ४५०+ पेक्षा अधिक धावा काढणारा भारताचा एकमेव फलंदाज ठरला आहे. त्यापाठाेपाठ शिखर धवन (२७७) दुसऱ्या आणि काेहली (१२९) तिसऱ्या स्थानावर आहेत.

हाॅलंडसमाेर झिम्बाब्वे संघ : हाॅलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात बुधवारी अॅडिलेच्या मैदानावर सकाळी ९.०० वाजेपासून सामना रंगणार आहे हाॅलंड संघ मुख्य फेरीत विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे झिम्बाब्वे संघाला आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय गरजेचा आहे.

बातम्या आणखी आहेत...