आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलग दोन पराभवानंतर आयपीएलच्या चालू हंगामात हैदराबादच्या संघाने पहिला विजय मिळवला आहे. तर चेन्नईला मात्र सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. अप्रतिम गोलंदाजी आणि अभिषेक शर्माच्या झंझावाती 75 धावा यामुळे सनराइज हैदराबाद संघाला चेन्नई सुपर किंग्सवर मात करण्यात यश आले. हैदराबादच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी देखील संघाचे मन भरून कौतुक केले.
चेन्नईची सुरुवातच खराब झाली. सुरुवातीच्या खेळात डगमगलेला डाव नंतर मोईन अली आणि रायडू या जोडीने सावरण्याचा प्रयत्न केला होता. मद्रास सुंदर च्या गोलंदाजीसमोर या दोघांचाही निभाव लागला नाही.
हैदराबाद फायनलपर्यंत जाईल
हैदराबाद संघाने चेन्नईचा पराभव केला असला तरी याआधी संघाला दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, चेन्नई सारख्या बलाढ्य संघ आणि धोनी असल्यामुळे या संघाला पराभूत केल्याने चाहत्यांनी हैदराबाद संघावर विश्वास व्यक्त केला आहे. हैदराबादचा संघ अंतिम सामन्यापर्यंत धडक मारेल असा विश्वास चाहत्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केला.
धोनीचे फॅन्स म्हणतात, 'माही है तो मुमकिन है...'
आयपीएलच्या चालू हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शनिवारी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादने चेन्नई संघाचा 8 गडी राखून पराभव केला. हैदराबाद संघाचा हा पहिला विजय असला तरीदेखील चेन्नईचा हा सलग चौथा पराभव आहे. असे असले तरी जोपर्यंत संघांमध्ये महेंद्रसिंग धोनी आहे, तोपर्यंत संघाला चिंता नाही. संघ पुनरागमन करेल, असा विश्वास धोनीच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.