आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊच्या एकाना मैदानात 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत केले. सामन्यातील विजय-पराजयापेक्षा विराट कोहली, नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांच्यातील वादानेच हा सामना चर्चेत राहीला.
कोहलीने शूज दाखवत स्लेडिंग केले आणि त्यानंतर प्रकरण वाढले. सामन्यानंतर गंभीर आणि कोहलीमध्ये बराच वेळ वादही झाला. वादात दोघांमध्ये काय बोलणे झाले हे आतापर्यंत कळूच शकले नाही. दोन्ही संघांपैकी एकाच्या डगआऊटमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने संपूर्ण घटना पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितली.
त्याने सांगितले की, नवीन-उल-हक सोबतच्या वादानंतर गंभीर जेव्हा तिथे आला. तेव्हा कोहलीने त्याला विचारले होते की, तू या प्रकरणात का शिरला आहेस? गंभीरने उत्तर दिले होते- तू माझ्या खेळाडूला बोललास म्हणजे माझ्या कुटुंबाला शिवी दिली. भांडणानंतर, कोहलीला आणि लखनऊचा प्रशिक्षक गंभीरला त्याच्या मॅच फीच्या 100% दंड लागला. तर नवीनला 50% दंड ठोठावण्यात आला.
प्रत्यक्षदर्शीने सांगितले- प्रकरण चिघळू नये म्हणून गंभीरने मेयर्सला बाजूला नेले
प्रत्यक्षदर्शी म्हणाला, "तुम्ही टीव्हीवर पाहिले असेल की, मेयर्स आणि कोहली बॉन्ड्री जवळून बोलत चालले होते. मेयर्स विराटला विचारत होता की, तो सतत त्या लोकांना अपशब्द का वापरत होता. यावर विराटने उलट प्रश्न विचारला की, मेयर्स त्यांच्याकडे का रागाने का पाहत होता. याआधी फलंदाजीला आलेल्या अमित मिश्रानेही विराट नवीन-उल-हकला सतत शिवीगाळ करत असल्याची तक्रार अंपायरकडे केली होती.
विराट आणि मेयर्स एकत्र चालत असल्याचे पाहून गौतम गंभीरला वाटले की, प्रकरण आणखी बिघडू नये. विराटशी बोलू नकोस, असे त्याने मेयर्सला सांगितले. यावर विराटने गौतम गंभीरवरही कंमेट केली.
यावर गंभीर म्हणाला, काय बोलतोस, बोल? तेव्हा विराट म्हणाला होता- मी तुम्हाला काहीच बोललो नाही. तुम्ही का यात घुसत आहात. यावर गंभीरने उत्तर दिले - जर तू माझ्या खेळाडूशी बोललात तर याचा अर्थ तु माझ्या कुटुंबाला शिवी देतोस. तेव्हा विराट म्हणाला होता- तर तुम्ही तुमचे कुटुंब सांभाळा. शेवटी, गंभीर म्हणाला – तर तू आता मला शिकवशील.
आता ते 4 फोटो, जे सामनादरम्यान झालेल्या संपूर्ण भांडणांची परिस्थिती सांगते....
हे ही वाचा
10 वर्षांनंतर भिडले गंभीर-कोहली:2013 नंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती, कोहलीने बंगळुरूचा बदला लखनऊमध्ये घेतला
आयपीएलच्या 16व्या हंगामात विराट कोहली आणि लखनऊ सुपरजायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर लखनऊच्या एकाना मैदानावर एकमेकांशी भिडले. आयपीएल दरम्यान या दोन खेळाडूंमध्ये वाद होण्याची ही पहिलीच घटना नाही. दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2013 मध्ये आयपीएलच्या सहाव्या हंगामातील एका सामन्यादरम्यान दोन खेळाडूंमध्ये मैदानावर बाचाबाची झाली होती. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.