आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलच्या चालू हंगामात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील राड्यानंतर गंभीर आणि धोनीच्या संबंधांचीही चर्चा सगळीकडे सुरू आहे. गौतम गंभीर आणि धोनीचे संबंध तेवढे चांगले नसल्याचे यापूर्वीच्या अनेक प्रसंगांतून समोर आले आहे. अशातच आता इरफान पठाणने यासंदर्भात एक नवा खुलासा केला आहे.
इरफानने केला खुलासा
आयपीएलमधील एका सामन्यात गंभीरने केलेल्या कृतीने धोनीचा इगो चांगलाच दुखावला होता असे इरफानने म्हटले आहे. लखनऊ आणि चेन्नईतील सामना बुधवारी रद्द झाला होता. यावेळी कमेंट्री बॉक्समधील चर्चेदरम्यान इरफानने याचा खुलासा केला.
धोनीसाठी टेस्ट फील्डिंग लावली
2016 मध्ये पुणे व कोलकाताच्या संघादरम्यान सामना सुरू होता. तेव्हा गंभीर केकेआरचा कर्णधार होता. यावेळी धोनी बॅटिंगला आल्यावर गंभीरने धोनीसाठी कसोटी क्रिकेटप्रमाणे फील्डिंग लावली होती. बेस्ट फिनिशर अशी ओळख असलेल्या धोनीला ही गोष्ट तेव्हा खूप जास्त लागली होती. इरफान तेव्हा पुणे संघाकडून खेळत होता.
गंभीरने धोनीसाठी लावलेल्या या फील्डिंगची तेव्ही चांगलीच चर्चा झाली होती. केकेआरने गंभीरच्या नेतृत्वात दोन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. धोनी कॅप्टन असतानाही गंभीर आणि धोनीत तितके चांगले संबंध नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.