आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबच्या कागिसो रबाडाने यंदा सोथ्यांदा घेतली कोहलीची विकेट
सामनावीर जॉनी बेअरस्टो (६६) व लियाम लिव्हिंगस्टोनच्या (७०) झंझावातापाठाेपाठ कागिसो रबाडा (३/२१), ऋषी धवन (२/३६) क्षोणि राहुल चहरच्या (२/३७) गोलंदाजीच्या बळावर पंजाब किंग्ज संघाने आयपीएलमध्ये शुक्रवारी शानदार सहावा विजय संपादन केला. मयंकच्या नेतृत्वाखाली पंजाब संघाने लीगमधील आपल्या १२ व्या सामन्यात फाफ डुप्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा पराभव केला. पंजाब संघाने ५४ धावांनी सामना जिंकला.
लिव्हिंगस्टोन क्षोणि जॉनी बेअरस्ट्राेच्या अर्धशतकाच्या बळावर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ९ गड्यांच्या माेबदल्यात बंगळुरू टीमसमाेर विजयासाठी २१० धावांचे टार्गेट ठेवले होते. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाला ९ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारता क्षोली. या सहाव्या विजयासह पंजाब संघाने गुणतालिकेत सहाव्या स्थानी धडक मारली. दुसरीकडे बंगळुरू संघाला सहाव्या पराभवाला सामाेरे जावे लागले.
बेअरस्टो, लिव्हिंगस्टोन यांची अर्धशतके
पंजाब किंग्ज संघाच्या फाॅर्मात असलेल्या सलामीवीर जॉनी बेअरस्टो (६६) क्षोणि लियाम लिव्हिंगस्टोनने (७०) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमविरुद्ध सामन्यात झंझावाती खेळी केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतके साजरी केली.
हर्षलची गोलंदाजी व्यर्थ : बंगळुरू संघाकडून युवा गोलंदाज हर्षल पटेल चमकला. त्याने संघाकडून सामन्यात सर्वाधिक ४ बळी घेतले. तसेच हसरंगा डिसिल्व्हाने २, ग्लेन मॅक्सवेल क्षोणि शाहबाज अहमदने प्रत्येकी एक विकेट घेतली. मात्र, टीमच्या पराभवाने ही गोलंदाजी व्यर्थ ठरली.
धावफलक, नाणेफेक बंगळुरू (गोलंदाजी) पंजाब किंग्ज धावा चेंडू ४ ६ बेअरस्ट्राे झे.सिराज गो. अहमद ६६ २९ ०४ ७ शिखर धवन त्रि.गो. मॅक्सवेल २१ १५ ०२ १ राजपक्षे झे. हर्षल गो. डिसिल्वा ०१ ०३ ०० ० लिव्हिंगस्टोन झे.कार्तिक गो. हर्षल ७० ४२ ०५ ४ जितेश शर्मा त्रि.गो.डिसिल्वा ०९ ०५ ०२ ० हरप्रीत झे.मॅक्सवेल गो. हर्षल ०७ ०५ ०० १ ऋषी धवन झे.मॅक्सवेल गो. हर्षल ०७ ०३ ०० १ राहुल चहर धावबाद ०२ ०२ ०० ० कागिसो रबाडा नाबाद ०० ०१ ०० ० अवांतर : ०७ एकूण : २० षटकांत ९ बाद २०९ धावा. गोलंदाजी : ग्लेन मॅक्सवेल २-०-१७-१, हेझलवुड ४-०-६४-०, माे. सिराज २-०-३६-०, हसरंगा डिसिल्वा ४-०-१५-२, शाहबाज अहमद ४-०-४०-१, हर्षल ४-०-३४-४. रॉयल चॅलेजर्स बंगळुरू धावा चेंडू ४ ६ कोहली झे. राहुल गो. रबाडा २० १४ ०२ १ डुप्लेसिस झे. शर्मा गो. ऋषी १० ०८ ०२ ० रजत झे.धवन गो. राहुल २६ २१ ०१ २ महिपाल झे. धवन गो. ऋषी ०६ ०३ ०० १ मॅक्सवेल झे.अर्शदीप गो. हरप्रीत ३५ २२ ०३ १ कार्तिक झे.राजपक्षे गो. अर्शदीप ११ ११ ०१ ० शाहबाज झे.राजपक्षे गो. रबाडा ०९ १४ ०० ० हर्षल झे.मयंक गो.रबाडा ११ ०७ ०२ ० डिसिल्वा झे.हरप्रीत गो. राहुल ०१ ०३ ०० ० माे. सिराज नाबाद ०९ १३ ०१ ० जाेश हेझलवुड नाबाद ०७ ०४ ०१ ० अवांतर : १०, एकूण : २० षटकांत ९ बाद १५५ धावा. गोलंदाजी : हरप्रीत ४-०-३३-१, अर्शदीप ४-०-२७-१, रबाडा ४-०-२१-३, ऋषी ४-०-३६-२, राहुल ४-०-३७-२. सामनावीर : जॉनी बेअरस्ट्राे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.