आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LSG vs GT Fantasy 11 गाइड:कर्णधार केएल राहुलने केल्या आहेत 451 धावा, उपकर्णधार राशिद खान देखील मिळवून देऊ शकतो गुण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज IPL च्या 57 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे (MCA), पुणे येथे होणार आहे. दोन्ही संघ प्रथमच स्पर्धेत सहभागी होत असून त्यांची कामगिरी इतर सर्व संघांपेक्षा सरस ठरली आहे. दोघांनी 11 सामने खेळले असून 8 जिंकले आहेत.

आजचा सामना कोणता संघ जिंकेल तो अधिकृतपणे प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनेल. दोन्ही संघांकडे उत्कृष्ट फलंदाज आणि मजबूत गोलंदाज आहेत. फॅंटेसी संघात सहभागी असलेले कोणते खेळाडू अधिक गुण मिळवून देवू शकतात ते पाहू या.

विकेटकीपर

केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांना फॅंटेसी संघाचा भाग म्हणून घेणे फायदेशीर ठरु शकते. या दोघांची सलामीची जोडी लखनऊसाठी खूप उपयुक्त ठरली आहे. गेल्या सामन्यात राहुल एकही चेंडू न खेळता धावबाद झाला होता, पण सध्या तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत जोस बटलरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

राहुल गुजरातविरुद्धच्या मागील अपयशाची भरपाई करू शकतात. पॉवरप्ले दरम्यान डी कॉक गोलंदाजांची भंबेरी उडवतो आणि संघाला झटपट सुरुवात करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करतो. त्याच्या बॅटमधून आणखी एक धडाकेबाज खेळी येऊ शकते.

फलंदाज

डेव्हिड मिलर, दीपक हुडा आणि शुभमन गिल यांची फलंदाज म्हणून निवड होऊ शकते. गुजरातच्या मधल्या फळीत मिलरची किलर स्टाईल सतत दिसून येते. हार्दिकच्या अनुपस्थितीत नाबाद 94 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून देणारा मिलर लखनऊ विरुद्धही शानदार खेळ करू शकतो. दीपक हुडाचा IPL चा हंगाम पहिल्यांदाच इतका चांगला जात आहे. टी-20 प्लेइंग 11 मध्ये टीम इंडियाच्या स्थानाचा हा परिणाम असावा. लखनऊ हुडाला प्रथम फलंदाजीसाठी पाठवत आहे आणि तो चांगल्या धावा काढत आहे

आधी ऑफ-स्टंपबाहेरचे चेंडू ही त्याची कमजोरी मानली जात होती, पण आता तो या डावपेचाला चोख प्रत्युत्तर देत आहे. शुभमन गिलने हंगामाची सुरुवात धमाकेदारपणे केली होती, पण नंतर त्याची बॅट मध्येच नि:शब्द झाली. अखेर मुंबईविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावून तो फॉर्ममध्ये परतला आहे. गिल आणखी एका दमदार कामगिरीने लखनऊच्या समर्थकांचे मन जोडू शकतो.

अष्टपैलू

हार्दिक पांड्या, कृणाल पंड्या आणि राहुल तेवतिया हे अष्टपैलू म्हणून उपयुक्त ठरु शकतात. हार्दिक पंड्या टॉप ऑर्डरमध्ये धमाकेदार फलंदाजी करत आहे. त्याच वेळी, तो त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या कौशल्याने धावबाद करून मोठ्या विकेट्स मिळवत आहे. हार्दिक आणखी एक धडाकेबाज खेळी खेळू शकतो.

कृणाल पांड्या हा अतिशय धोकादायक गोलंदाज म्हणून समोर आला आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक त्याच्याच चेंडूवर बाद झाला होता. क्रुणाल किफायतशीर गोलंदाजीसोबत फलंदाजीतही मोठे फटके खेळू शकतो. राहुल तेवतिया शेवटच्या षटकात षटकार मारून संघाला अतुलनीय विजय मिळवून देत आहे. त्याची आक्रमक शैली गुण मिळवन देवू शकते.

गोलंदाज

रशीद खान, दुष्मंथा चमीरा आणि लॉकी फर्ग्युसन हे गोलंदाज म्हणून खूप फायदेशीर ठरू शकतात. रशीदच्या गूढ फिरकीसमोर अनुभवी फलंदाजही धावा करणे टाळत आहेत. तो धमाकेदार गोलंदाजी स्पेलसह शेवटच्या टप्प्यात येऊन फलंदाजीची ताकद दाखवू शकतो.

दुष्मंथा चमिरा 145 किमी प्रति तास पेक्षा जास्त वेगाने सतत गोलंदाजी करताना फलंदाजांमध्ये दरारा निर्माण करत आहे. तो विकेट घेऊ शकतो. उमरान खाननंतर मोसमातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू टाकणारा लॉकी फर्ग्युसन पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...