आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग 5 विजयानंतर गुजरातचा पराभव:1 षटकात 30 धावा करून लिव्हिंगस्टोनने पंजाबला मिळवून दिला विजय, गब्बरची अर्धशतकी खेळी

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलमध्ये मंगळवारी पंजाब किंग्जने एकतर्फी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव केला. PBKS चे 144 धावांचे लक्ष्य पंजाब संघाने 16 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले.

शिखर धवनने नाबाद 62 धावा केल्या आणि तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याचवेळी लियाम लिव्हिंगस्टोनने फलंदाजी करताना अवघ्या 10 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या.

पंजाब किंग्जचा 10 सामन्यांमधला हा पाचवा विजय ठरला. या संघाने 5 सामनेही गमावले आहेत. त्याचबरोबर गुजरातचा सलग 5 विजयानंतरचा हा पहिला पराभव आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखालील संघाने 10 पैकी 8 सामने जिंकले आणि 2 सामने गमावले.

या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना गुजरातच्या फलंदाजाने निराशा केली आणि संघाने 20 षटकांत 143/8 धावा केल्या. साई सुदर्शनने सर्वाधिक 64 धावांची नाबाद खेळी केली. पीबीकेएससाठी कगिसो रबाडाने 4 विकेट्स घेतल्या.

हायलाईट्स

भानूका राजपक्षेची दमदार खेळी

पंजाबचा फलंदाज भानूका राजपक्षे याने दमदार खेळी करीत 40 धावा करून संघाची वाटचाल विजयाकडे नेली. आपल्या 40 धावांच्या खेळीत त्याने 28 चेंडूचा सामना करताना षटकार 1 आणि 5 चौकार खेचले. तो गो लाकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर पायचित झाला.

बेअरस्टोचा खराब फॉर्म कायम

पंजाबचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोचा खराब फार्म कायम असून आजही त्याने फलंदाजीत निराशा केली. त्याने 6 चेंडूत फक्त 1 धाव काढली. त्याची विकेट मोहम्मद शमीने घेतली. या मोसमात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकलेले नाही. गेल्या 5 सामन्यात त्याने 32, 6, 9, 12, 12 धावा केल्या आहेत.

साई सुदर्शन वगळता एकाही फलंदाजाला गुजरातसाठी चांगली खेळी करता आली नाही. पंजाबच्या गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासून गुजरातवर दडपण ठेवले. रबाडाच्या खात्यात सर्वाधिक 4 विकेट आल्या.

गुजरातसाठी सुदर्शन ठरला संकटमोचक ​​​​​​​

साई सुदर्शनने चांगली फलंदाजी करत आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक 42 चेंडूत पूर्ण केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना साईने संघासाठी संकटमोचकाची भूमिका निभावली. त्याने 128 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 64 धावा केल्या.

रबाडाची घातक गोलंदाजी

कगिसो रबाडा
कगिसो रबाडा

या सामन्यात कगिसो रबाडाने शानदार गोलंदाजी करत 35 धावांत 4 बळी घेतले. त्याने सलग दोन चेंडूत राहुल तेवतिया आणि राशिद खान यांना बाद केले. रबाडाशिवाय ऋषी धवन आणि लियाम लिव्हिंगस्टोनला प्रत्येकी एक विकेट मिळाली आहे.

सलामीवीर फेल, गिल धावचित

शुभमन गिल
शुभमन गिल

चौथ्या षटकापर्यंत गुजरातचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. शुभमन गिल 9 धावा करून बाद झाला. धाव चोरण्याच्या प्रयत्नात ऋषी धवनच्या डायरेक्ट थ्रो वर तो धावचित झाला. त्याने 6 चेंडूत 9 धावा केल्या. त्यात त्याने 2 चौकार लगावले.

ऋद्धिमानने 21 धावांवर आऊट

ऋद्धिमान साहा
ऋद्धिमान साहा

ऋद्धिमानने 21 धावांवर आपली विकेट गमावली. कगिसो रबाडाच्या चेंडूवर त्याचा उडालेला झेल मयंक अग्रवाल याने अलगद टिपला. त्याने एकुण 17 चेंडू खेळले. आपल्या खेळीत त्याने 1 षटकार आणि 3 चौकार लगावले. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याची बॅटही खेळली नाही. तो 7 चेंडूत केवळ एक धाव करू शकला आणि ऋषी धवनचा बळी ठरला.

बातम्या आणखी आहेत...