आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL च्या रंजक कथा:हर्षल पटेल मंकडिंग करण्यास चुकला; बेन स्टोक्सच्या डोक्यात पेटला दिवा अन् केली वाद रोखण्यास नवी सूचना

स्पोर्ट्स डेस्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

RCB ला लखनऊविरोधातील सामन्यात शेवटच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला. शेवटच्या चेंडूवर लखनऊला अवघी 1 धाव हवी होती. यावेळी हर्षल पटेलने नॉन स्ट्राइकवर उभ्या असणाऱ्या बॅट्समनला मंकडिंगवर बाद करण्याचा एक अपयशी प्रयत्न केला.

हर्षलचा हा प्रयत्न सफल झाला असता तर कदाचित बिश्नोई तंबूत परतून सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता. पण त्याच्या या कृतीमुळे पुन्हा एकदा क्रिकेटमधील मंकडिंग वादाची ठिणगी पेटली आहे.

काय म्हणाले हर्षा भोगले

त्याचे झाले असे की, इंग्लंडचा क्रिकेटपटू तथा चेन्नई सुपर किंगचा सदस्य बेन स्टोक्स व क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी सामन्यानंतर यासंबंधी एकेक ट्विट केले. त्यांचे हे ट्विट्स क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. हर्षा आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, 'बिश्नोईने लवकर क्रीज सोडली होती. त्यामुळे नॉन स्ट्रायकरवरील फलंदाजाला धावबाद करू नका असे म्हणणारे लोक आजही आहेत का?' कमेंटेटर भोगले यांचे ट्विट पाहून बेन स्टोक्सनेही त्यावर आपले मत व्यक्त केले.

काय म्हणाला स्टोक्स

स्टोक्सने या वादावर तोडगा काढण्यासाठी एक सूचना केली. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणाला - 'मैदानावरील पंचांनी हुशारीने काम घेतले पाहिजे. फलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीज सोडली तर दंड म्हणून 6 धावा दिल्या पाहिजे. असे झाले तर निश्चितच कोणताही वाद न होता फलंदाजांना असे करण्यापासून रोखता येईल.' बेन स्टोक्सच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

संस्मरणीय सामना

उल्लेखनीय बाब म्हणजे, आरसीबीने सोमवारच्या सामन्यात 212 धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या लखनऊने 9 गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या चेंडूवर हे आव्हान यशस्वीपणे पार केले. या सामन्यात निकोलस पूरनने 19 चेंडूंत 62 धावा करून सामन्याचे चित्र फिरवले. पूरनशिवाय स्टोयनिस यांनी 30 चेंडूंत 65 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, आरसीबीतर्फे कोहलीने 61 व फाफ ड्यूप्लेसीने 79 धावांची आक्रमक खेळी केली. तर मॅक्सवेलने 29 चेंडूंत 59 धावा केल्या होत्या.