आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये आज दिपक हुड्डासमोर दिल्ली:3 सामने खेळले आणि तिन्हीमध्ये केली तुफान फलंदाजी, सलग केली 2 वेगवान अर्धशतके

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल-15 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार असून या सामन्यात रोहतकच्या दीपक हुड्डासमोर मोठे आव्हान असेल. दीपकने या आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ तीन सामन्यांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. यामध्ये त्याच्या दोन चमकदार अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने गरजेच्या वेळी संघासाठी गोलंदाजीही केली आहे. दीपकच्या फलंदाजीच्या जोरावर लखनऊची विजयी घोडदौड सुरूच आहे.

असा आहे आतापर्यंतचा प्रवास
दीपकने आतापर्यंत IPL-15 मध्ये तीन सामन्यांत 119 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. पहिल्या सामन्यात त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध 41 चेंडूत 55 धावा केल्या होत्या, तर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने केवळ 33 चेंडूत 51 धावा केल्या होत्या. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर लखनऊच्या संघाला हैदराबादच्या संघाचा पराभव करता आला.

131 चा स्ट्राइक रेट
दीपकने आयपीएलमध्ये 131 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांच्या बरोबरीने आहे. दीपकने आतापर्यंत आयपीएलच्या सात सीझनमध्ये खेळून 83 सामन्यांत 904 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 51 चौकार आणि 44 षटकार मारले आहेत. वैयक्तिकरित्या, 64 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

बातम्या आणखी आहेत...