आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंग प्लेअर ऑफ द वीक:नेमारचा चाहता आहे हसरंगा, त्याच्या शैलीमध्ये साजरा करतो जल्लोष, ​​​​​​​आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो

औंरगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारा हसरंगा केकेआरविरुद्ध ४ गडी बाद करत सामनावीर ठरला होता. २ सामन्यांत ५ बळी घेत यंदाच्या सत्रात त्यांच्याकडे पर्पल कॅप आहे.

वानिंदू हसरंगा
वय : २५ वर्षे
खेळ : क्रिकेट
देश : श्रीलंका

-पिनाडुवेगे वानिंदू हसरंगा डिसिल्व्हा क्रिकेटर चतुरंगाचा छोटा भाऊ आहे. यष्टिरक्षक चतुरंगा २०१५ मध्ये श्रीलंकन संघाचा सदस्यदेखील होता.

-हसरंगाचा आवडता खेळाडू फुटबॉलपटू नेमार आहे. त्यामुळे बळी घेतल्यानंतर त्याचा जल्लोष ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटूच्या शैलीशी मिळता-जुळता आहे.

-हसरंगा वनडे इतिहासात हॅट‌्ट्रिक घेणारा तिसरा खेळाडू आहे. १९ व्या वर्षी त्याने श्रीलंकेसाठी वनडेत पदार्पण केले आणि झिम्बाब्वेविरुद्ध हॅट‌्ट्रिक घेत आपल्या करिअरची सुरुवात केली.

-आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली लागलेला तो खेळाडू आहे. बंगळुरूने २०२२ च्या लिलावात १०.७५ कोटी रुपयांत त्याला खरेदी केले. त्याची मुळे किंमत १ कोटी रुपये होती.

-मार्च २०२१ मध्ये आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना हसरंगाने विंडीजविरुद्ध नाबाद ८० धावांची खेळी केली होती व या क्रमांकावर सर्वोच्च धावा करणारा श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला. -२० सप्टेंबर २०२१ रोजी केकेआरविरुद्ध आपले आयपीएल पदार्पण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...