आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • Highest Targets Successfully Chased Down In Ipl History, Lucknow Super Giants Are Now The Top 4 Teams In The IPL

IPL 2022:IPL चा चौथा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग आता लखनऊ सुपर जायंट्सच्या नावावर, हे आहेत टॉप-3 संघ

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

IPL मध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर 211 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आयपीएलच्या इतिहासातील हा चौथा सर्वात मोठा धावांचा पाठलाग होता. केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांच्यातील पहिल्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी आणि त्यानंतर एविन लुईस आणि आयुष बदोनी यांच्या शानदार फलंदाजीमुळे LSG ला हे मोठे लक्ष्य गाठता आले. वाचा IPL टे टॉप-3 रन चेज..

1. आयपीएलचा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग राजस्थान रॉयल्सच्या नावावर नोंदवला गेला आहे
आयपीएल 2020 च्या नवव्या सामन्यात, राजस्थानने पंजाब किंग्ज विरुद्ध आयपीएलच्या सर्वात मोठ्या यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम केला होता. या सामन्यात प्रथम खेळताना पंजाबने मयंक अग्रवालचे शतक आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 2 गडी गमावून 223 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात स्टीव्ह स्मिथ (50), संजू सॅमसन (85) आणि राहुल टियोटिया (53) यांच्या शानदार खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने 19.3 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. राजस्थानने हा सामना 4 विकेटने जिंकला होता.

2. मुंबई इंडियन्सने IPL 2021 मध्ये केला होता दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग
आयपीएल 2021 च्या 27 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने फाफ डूप्लेसिस (50), मोईन अली (58) आणि अंबाती रायडू (72) यांच्या दमदार खेळीमुळे 4 विकेटवर 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने आपल्या सलामी फलंदाजाच्या मजबुत सुरुवातीने आणि नंतर किरॉन पोलार्डच्या 34 चेंडूत 87 धावांनी शेवटच्या चेंडूवर 219 धावांचे लक्ष्य गाठले होते.

3. राजस्थानने पहिल्या सीझनमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती
IPL च्या पहिल्या सीझनमध्ये राजस्थानने सर्वात मोठा धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम केला होता. IPL 2008 च्या 9व्या सामन्यात, अँड्र्यू सायमंड्सच्या 117 धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे डेक्कन चार्जर्सने 214 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ग्रीम स्मिथच्या 71 आणि युसूफ पठाणच्या 61 धावांच्या खेळीने राजस्थानला विजयाच्या जवळ आणले होते. अखेरच्या सामन्यात शेन वॉर्नने 9 चेंडूत 22 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता.

बातम्या आणखी आहेत...