आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित आऊट झाल्यावर रितिका झाली निराश:RR विरुद्ध अवघ्या 10 धावा करून हिटमॅन आऊट झाला, पाहा रितिकाच्या रिअ‍ॅ​​​​​​​क्शनचा VIDEO

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईचा आयपीएल 2022 मध्ये सलग दुसरा पराभव झाला. संघाचा कर्णधार रोहित शर्माची बॅटही या सामन्यात चमकली नाही आणि तो 10 धावा करून बाद झाला. त्याने 5 चेंडूंचा सामना केला आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. त्याची विकेट प्रसिद्ध कृष्णाने घेतली. आऊट झाल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याची पत्नी रितिका सजदेहची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी होती. तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. रितिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रोहितने द्विशतक केले होते, त्यानंतर रितिकाला आनंदाश्रू

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 2017 मध्ये त्याच्या लग्नाच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त वनडे क्रिकेटमधील तिसरे द्विशतक झळकावले होते. ती मॅच पाहण्यासाठी रितिकाही पोहोचली होती. रोहितने द्विशतक पूर्ण केले तेव्हा त्याची पत्नी रितिकाच्या डोळ्यात पाणी आले होते. तिचे आनंदाश्रू कॅमेऱ्यात कैद झाले होते. आयपीएलच्या प्रत्येक सीझनमध्ये रितिका आपल्या पतीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये नक्कीच पोहोचते.

मुंबईचे खाते अजूनही उघडलेले नाही

या आयपीएलमध्ये मुंबईला विजयाचे खाते शनिवारीही उघडता आले नाही. मुंबईला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थानने त्यांचा 23 धावांनी पराभव केला. चहलने डेथ ओव्हर्समध्ये शानदार गोलंदाजी करत 2 बळी घेतले. राजस्थानच्या बटलरने शतक केले.

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबईने सुरुवातीलाच रोहित शर्माची विकेट गमावली. इशान आणि टिळक यांनी 81 धावांची भागीदारी केली, पण दोघेही अर्धशतक ठोकल्यानंतर बाद झाले. यानंतर पोलार्डच्या संथ फलंदाजीमुळे संघाला १९४ धावांचा पाठलाग करता आला नाही.

मुंबईचा संघ आता आपला पुढचा सामना 6 एप्रिलला कोलकाताविरुद्ध खेळणार आहे. कोलकाताने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामने जिंकले तर एकात पराभवाला सामोरे जावे लागले. रोहितच्या संघाला कोलकाता कडवे आव्हान देताना दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...