आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखराब सुरुवातीनंतर नवा संघ लखनऊ सुपर जायंट्स संघाची गाडी पुन्हा ट्रॅकवर परतली. संघ सोमवारी सनरायझर्स हैदराबादचा सामना करेल. पदार्पणाच्या सत्रात एलएसजीची सुरुवात चांगली झाली नव्हती आणि संघाला गुजरात टायटन्सविरुद्ध ५ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर संघाने गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जला पराभूत करत शानदार पुनरागमन केले. कर्णधार राहुल व डिकॉकने पहिल्या गड्यासाठी ९९ धावांची भागीदारी केली होती. लुईसने २३ चेंंडूंत ५५ धावा केल्या होत्या. त्यामुळे चेन्नईने दिलेले २११ धावांचे आव्हान छोटे सिद्ध झाले. दुसरीकडे, फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे हैदराबादला आपल्या लढतीत राजस्थान रॉयल्सकडून ६१ धावांनी पराभूत व्हावे लागले. आता खेळाडूंना आपल्या सरासरी कामगिरीपेक्षा चांगली कामगिरी करावी लागेल.
लखनऊ सुपर जायंट्स : युवा आयुष बडोनीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
कर्णधार राहुलसोबत डिकॉक डावाची सुरुवात करेल. संघाला युवा आयुष बडोनीकडून पुन्हा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तो मोठे फटके खेळण्यात तरबेज आहे. संघाकडे दीपक हुड्डा, कृणाल पांड्या, होल्डर, स्टोइनिससारखे उत्कृष्ट अष्टपैलू आहेत. दुसरीकडे, मधल्या फळीत मनीष पांडे आहे, मात्र त्याचा खराब फॉर्म संघाची चिंता वाढवणारा आहे.
सनरायझर्स हैदराबाद : फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सुधारणा आवश्यक
संघासाठी कर्णधार विल्यम्सनचा अनुभव महत्त्वाचा ठरेल. राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन, अब्दुल समद, अभिषेक शर्मा यांच्या फलंदाजीची मदार असेल. गत सामन्यात एडन मार्करम एकाच लयीत होता. वाॅशिंग्टन सुंदरने चांगली खेळी केली होती. अब्दुल समदला फिनिशरची भूमिका बजावावी लागेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.