आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर अभिषेक शर्मा (७५) आणि राहुल त्रिपाठीने (नाबाद ३९) आपल्या झंझावाती खेळीतून सनरायझर्स हैदराबाद संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये विजयाचे खाते उघडून दिले. हैदराबाद संघाने पराभवाची मालिका खंडित करत यंदा पहिला सामना जिंकला. विलियम्सनच्या नेतृत्वात हैदराबादने आपल्या तिसऱ्या सामन्यात गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जला १७.४ षटकांत धूळ चारली. हैदराबादने ८ गड्यांनी रोमहर्षक विजय संपादन केला.
चेन्नई संघाला यंदा सलग चौथ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईने ७ बाद १५४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. संघाच्या विजयामध्ये कर्णधार विलियम्सनने ३२ धावांचे योगदान दिले. सलामीवीर अभिषेकने झंझावाती अर्धशतकातून विजयाचा पाया रचला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.