आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPl 2022:पाठलाग करताना राजस्थानने दुसऱ्यांदा लढत जिंकली; चहलने फिरवला सामना

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या सत्रातील नवव्या सामन्यात दुसऱ्यांदा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. दोन्ही वेळा राजस्थान रॉयल्सने ही कामगिरी केली. राजस्थानने ८ बाद १९३ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स ८ बाद १७० धावा करू शकला. राजस्थानच्या फिरकीपटूने सामना आपल्या बाजूने फिरवला. त्याने १६ व्या षटकात पहिल्या व दुसऱ्या चेंडूवर सलग दोन बळी घेतले. त्यानंतर मुंबईची धावगती संथ झाली. हे दोन गडी बाद होण्यापूर्वी मुंबईला ३० चेंडूंत ५८ धावांची गरज होती आणि संघाकडे ६ गडी शिल्लक होते.

खेळपट्टीवर कॅरेबियन हिटर केरोन पोलार्ड होता. त्याच्या उपस्थितीमुळे मुंबईला विजयाची अपेक्षा होती. मात्र चहलने त्याला अशी कामगिरी करण्याची संधी दिली नाही. त्यानंतर करुण नायरने मुरुगन अश्विनचा झेल सोडल्याने चहलची हॅट्ट्रिक हुकली. ईशान किशनने (५४) आयपीएलमध्ये सलग चौथे अर्धशतक झळकावले आणि टिळक वर्माने (६१) आपले पहिले अर्धशतक ठोकले. यापूर्वी जोस बटलरच्या (१००) दुसऱ्या शतकाच्या जोरावर राजस्थानने मोठी धावसंख्या उभारली. गत ६ आयपीएल शतकांमध्ये ५ राजस्थानची होती.

फिरकीपटूंनी सामना गाजवला, बुमराहने चुकांतून बोध घेतला
युजवेंद्र चहलने सामना बदलणारा स्पेल टाकला आणि सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला. त्याने टीम डेव्हिड व डॅनियल सॅम्सला सलग चेंडूवर बाद केले. मात्र, तो हॅट््ट्रिक घेऊ शकला नाही. त्यांच्या स्पॅलने राजस्थानचा विजय निश्चित केला. ईशान किशन व टिळक वर्माच्या ८१ धावांच्या भागीदारीने मुंबई संघाच्या अपेक्षा वाढवल्या होत्या. या युवा जोडीने संजू सॅमसनच्या संघाची काही काळासाठी चिंता वाढवली होती. मात्र चहलने ही जोडी फोडली, मार्ग सुकर केला.

बातम्या आणखी आहेत...