आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थॅॉमस चषक:भारताचा सलग दुसरा विजय, कॅनडाचाही उडवला धुव्वा, भारतीय संघ 5-2 ने विजयी; गुणतालिकेत अव्वल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघाने थॅॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसरा मोठा विजय संपादन केला. भारतीय बॅडमिंटन संघाने स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात कॅनडाचाही धुव्वा उडवला. भारताने ५-० ने सामना जिंकला. भारतीय संघाने सलामी सामन्यात ५-० ने जर्मनीवर मात केली होती. ऑता दुसऱ्या विजयासह भारतीय पुरुष संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी ऑहे. श्रीकांतने संघाला विजयाचे खाते उघडून दिले. त्याने एकेरीच्या सामन्यात कॅनडाच्या ब्रायन यंगवर मात केली. त्याने २०-२२, २१-११, २१-१५ ने सामना जिंकला. त्यानंतर एचएस प्रणयने एकेरीच्या सामन्यात बी. ऑर. संकीर्तला पराभूत केले. त्याने २१-१५, २१-१५ ने विजय संपादन केला. प्रियांशू राजावतने संघाचा विजय निश्चित केला. त्याने तिसऱ्याच लढतीत व्हिक्टरला २१-१३, २०-२२, २१-१४ ने पराभूत केले.

दरम्यान, महाराष्ट्राच्या चिराग शेट्टीने दुहेरीत सात्त्विकराजसोबत एकतर्फी विजय साकारला. या जोडीने सामन्यात जेसन-केविनला २१-१२, २१-११ ने पराभूत केले. कृष्णा-विष्णवर्धनने दुहेरीच्या लढतीत डाेंग अॅडम व याकुराला २१-१५, २१-११ ने धूळ चारली.

बातम्या आणखी आहेत...