आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RCB ला धूळ चारण्यासाठी मैदानात उतरणार चहल:युजवेंद्र चहलचा सामना आज जुनी टीम बंगळुरुसोबत; इकडे सूड घेण्याचे तर दुसरीकडे जिंकण्याचे आव्हान

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणाच्या जिंदचा सुपुत्र युजवेंद्र चहलसाठी आजचा दिवस हिशोब क्लियर करण्याचा आहे. IPL-15 मध्ये, मंगळवारी संध्याकाळी राजस्थान रॉयल्स (RR) ची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध लढत आहे. युझवेंद्र चहल हा सीझन-15 पर्यंत आरसीबीचा भाग होता, पण यावेळी आरसीबीने त्याला वगळले होते आणि तो आरआरच्या टीममध्ये सामिल झाला. आज, येथे मुद्दा केवळ दोन संघांमधील सामन्याचा नाही. तर एकमेकांसाठी आव्हान बनलेल्या RCB आणि युजवेंद्र चहल यांचा आहे.

युजवेंद्र चहलसाठी आव्हान आहे की, त्याला कोणत्याही परिस्थितीत RCB वर भारी पडायचे आहे. दुसरीकडे, RCB ला दाखवून द्यायचे आहे की, चहलला न खरेदी करून त्यांनी मोठी चूक केलेली नाही. तसेच दोनपैकी एक सामना गमावल्यानंतर हा सामना जिंकणेही त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे. तसेच युजवेंद्र चहलच्या चाहत्यांचे लक्ष असेल की, तो त्याला सोडून देणाऱ्यांना कशा प्रकारे धडा शिकवण्यात यशस्वी होतो.

दोन्ही संघांवर विजयाचे दडपण
राजस्थान रॉयल्सच्या युजवेंद्र चहलचा सामना आज त्याच्या जुना संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. चहल गेल्या सीझनपर्यंत बंगळुरूचा भाग होता. या सीझनपासून तो राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. राजस्थान रॉयल्स संघाने शेवटचे दोन्ही सामने जिंकले आहेत. ज्यामध्ये चहलच्या गोलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने दोन्ही सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. मंगळवारच्या सामन्यात चहलची आरसीबीविरुद्धची कामगिरी कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरसीबी त्यांना धक्का देऊ शकेल की चहलच्या हातून पराभूत होईल हे पाहणे फारच रोमांचक असणार आहे.

चहलने राजस्थानच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत
यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) साठी कामगिरी करणारा युजवेंद्र चहल यावेळी राजस्थान रॉयल्ससाठी (RR) आपली कामगिरी दाखवत आहे. मेगा लिलावात युझवेंद्र चहलला राजस्थानने 6.50 कोटींना विकत घेतले. राजस्थानसाठी चहलला विकत घेणे चांगले ठरले. राजस्थानने या सीझनमध्ये दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाला होता, ज्यात चहलने चार षटकांत 22 धावा देत तीन बळी घेतले होते. दुसरा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होता, त्यातही राजस्थानने बाजी मारली. या सामन्यात चहलने दोन बळी घेतले. जुन्या संघाला धडा शिकवण्याचे दडपणही त्याच्यावर असल्याने आजही तो आपली ताकद दाखवेल अशी अपेक्षा आहे.

आरसीबीसमोर चहलचे आव्हान आहे
या सीझनच्या पूर्वीपर्यंत युझवेंद्र चहल आरसीबीचा भाग होता. यावेळी बंगळुरूने चहलला रिटेन केले नाही, त्यामुळे राजस्थान रॉयल्सने त्याला विकत घेतले. चहलची बंगळुरूसाठी यापूर्वीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 114 सामन्यात 139 विकेट घेतल्या आहेत. गेल्या मोसमात चहल हा आरसीबीचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. आजच्या सामन्यात चहलचे आरसीबीसमोर आव्हान असणार आहे. आरसीबीने या सीझनमध्ये दोन सामने खेळले आहेत ज्यात संघाचा एक विजय आणि एक पराभव आहे. त्यामुळे आजचा सामना आरसीबीसाठी खास ठरणार असल्याचे मानले जात आहे, कारण यापूर्वी त्यांच्या संघाचा भाग असलेला चहल आज त्यांच्यासमोर गोलंदाजी करताना दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...