आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BCCI वर आर्थिक संकट:टुर्नामेंट रद्द झाल्यावर बोर्डाला होणार 2000 कोटींचे नुकसान; यावर्षीच्या टी-20 विश्व चषकातील कोट्यावधींच्या कमाईवरही प्रश्नचिन्ह

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रद्द न झाल्यावर BCCI ला 3 हजार कोटींचा फायदा

मागील दोन दिवसांत आयपीएलमधील चार खेळाडू आणि 2 कोचिंग स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानंतर टुर्नामेंट स्थगित करण्यात आला आहे. उर्वरित सामने पुढे कधी घेतले जातील, याबाबत अजून काहीच सांगण्यात आलेले नाही. जर येत्या काही दिवसांमध्ये परिस्थिती सुधारली नाही आणि आयपीएल रद्द करण्याची वेळ आली, तर बीसीसीआयला 2000 कोटी रुपयांचे नुकसान होईल. तसेच, यावर्षी भारतात होणाऱ्या टी-20 विश्व चषकावरही कोरोनाचे सावट आहे. या कोरोनामुळे भारतात होणारा विश्व चषक रद्द होऊन इतर देशात घेतला जाऊ शकतो. यामुळे, BCCI ला कोट्यावधींचे नुकसान होऊ शकते.

यावर्षीही IPL गवर्निंग काउंसिलने मागच्या सीजनप्रमाणे कुठलीच व्हॅल्यू अॅड केली नाही. अशातच बोर्डाने मध्येच टुर्नामेंट रद्द केल्यावर 50% म्हणजेच 2000 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. यासोबतच बोर्डाला ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठीही रेव्हेन्यू जनरेट करायचा आहे.

IPL गवर्निंग काउंसिलला UAE मध्ये करायचा होता टुर्नामेंट

सूत्रांनी आम्हाला सांगितल्यानुसार, IPL गवर्निंग काउंसिल मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही टुर्नामेंट UAE मध्ये करण्याच्या विचारात होते. तिकडे आयपीएल झाले असते, तर यशस्वीरित्या पूर्ण झाले असते. पण, कोरोना उद्रेकानंतरही याचे आयोजन भारतात करण्यात आले आणि परिणाम आता सर्वांसमोर आहे.

खरतर, भारतात टुर्नामेंट आयोजित करुन BCCI ला हे दाखवून द्यायचे होतेक की, आम्ही टी-20 वर्ल्ड कपसाठी तयार आहोत. यावर्षी टी-20 वर्ल्ड कप ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

का रद्द होऊ शकत नाही IPL?
IPL मधून BCCI ला खूप फायदा होतो. यातून सरकारला वेळेवर टॅक्स मिळत आहे. BCCI ने 2007-08 नंतर 3500 कोटी टॅक्स भरला आहे. IPL च्या आधी BCCI ला एक चॅरिटेबल ऑर्गेनायजेशन समजले जायचे. पण, आता आयपीएलमधून BCCI 40% रेव्हेन्यू जनरेट करतो. टेलीग्राफच्या एका रिपोर्टनुसार, वर्ल्ड क्रिकेटची इकोनॉमी अंदाजे 15 हजार कोटी रुपये आहे. यातील 33% म्हणजेच, 5 हजार कोटी रुपये एकट्या IPL मधून येतात. यामुळेच BCCI ला IPL च्या आयोजनासाठी जगातील इतर क्रिकेट बोर्डांकडून मदत मिळत आहे.

रद्द न झाल्यावर 3 हजार कोटींचा फायदा

2019 मध्य IPL ची व्हॅल्यू 47 हजार कोटी रुपये होती. तर, BCCI चे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी सांगितल्यानुसार, बोर्डाला मागच्या सीजनमधून 4000 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. जर, यावर्षी टुर्नामेट यशस्वी झाला, तर बोर्डाला तीन हजार कोटींचा फायदा होईल.

बातम्या आणखी आहेत...