आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल:राजस्थान राॅयल्सचा विजय; काेलकाता टीमचा चाैथा पराभव, माॅर्गन फ्लाॅप, संजू चमकला

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थान संघाचा १८.५ षटकांत ६ गड्यांनी काेलकात्यावर विजय

गाेलंदाज क्रिस माॅरिस (४/२३) पाठाेपाठ कर्णधार संजू सॅमसन (नाबाद ४२) आणि डेव्हिड मिलरच्या (नाबाद २४) शानदार फलंदाजीच्या बळावर राजस्थान राॅयल्स संघाने शनिवारी आयपीएलमध्ये विजय संपादन केला. राजस्थान संघाने १८.५ षटकांत माॅर्गनच्या काेलकाता नाइट रायडर्स टीमवर ६ गड्यांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना काेलकाता संघाने ९ बाद १३३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात राजस्थान राॅयल्स संघाने चार गड्यांच्या माेबदल्यात ७ चेंडू राखून विजय मिळवला. यासह राजस्थान संघाने लीगमध्ये दुसरा विजय साजरा केला. दुसरीकडे काेलकाता संघाला लीगमध्ये चाैथ्या पराभवाचा सामना करावा लागला. टीमचे गाेलंदाज या सामन्यात सपशेल अपयशी ठरले.

माॅर्गन फ्लाॅप, संजू चमकला : काेलकाता संघाचा कर्णधार इयान माॅर्गन पुन्हा एकदा सामन्यात अपयशी ठरला. त्याला शनिवारी राजस्थान संघाविरुद्ध माेठी खेळी करता आली नाही. ताे शून्यावर बाद झाला. ताे चाेरटी धाव घेताना बाद झाला. दुसरीकडे राजस्थान राॅयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने शानदार नाबाद ४२ धावांची खेळी केली.

क्रिस माॅरिसचे शानदार चार बळी
राजस्थान राॅयल्स संघाच्या क्रिस माॅरिसने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शानदार गाेलंदाजी केली. त्याने चार षटकांत २३ धावा देताना ४ बळी घेतले. त्याने काेलकाता टीमच्या कार्तिक, आंद्रे रसेल, कमिन्स आणि शिवम मवीला बाद केले. तसेच युवा गाेलंदाज सकारिया, उनाडकत व रहमानने प्रत्येकी १ विकेट घेतली.

बातम्या आणखी आहेत...