आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

DC vs SRH:सत्रातील पहिल्याच सुपर ओव्हरमध्ये दिल्ली विजयी; हैदराबादचा पराभव

चेन्नई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पृथ्वी शॉचे अर्धशतक आणि आवेश-अक्षरच्या 5 विकेटने सामना पलटवला

युवा कर्णधार ऋषभ पंतच्या कुशल नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने रविवारी यंदाच्या सत्रातील आयपीएलमधील पहिला सुपर ओव्हर सामना जिंकला. दिल्ली संघाने या सामन्यात डेव्हिड वाॅर्नरच्या सनरायझर्स हैदराबादवर मात केली. यासह दिल्ली संघाला आयपीएलमध्ये चाैथा विजय साकारता आला. याच विजयाच्या बळावर दिल्ली संघाने आठ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर धडक मारली. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघाला चाैथ्या पराभवाचा सामना करावा लागला.

सामनावीर पृथ्वी शाॅ (५३) पाठाेपाठ शिखर धवन (२८) आणि कर्णधार ऋषभ पंतच्या (३७) शानदार खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १५९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघानेही ७ गड्यांच्या माेबदल्यात १५९ धावांची खेळी करून सामना टाय केला. त्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला.

सुपर ओव्हर; २ चाैकार
दिल्लीच्या फिरकीपटू अक्षर पटेलने सुपर ओव्हर टाकली. यामध्ये हैदराबादकडून वाॅर्नरने २ व विलियम्सनने ५ धावा काढल्या. अशा प्रकारे हैदराबादने ७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीकडून ऋषभ (६) व धवनने (२) रशिदच्या षटकात आठ धावा काढल्या. या सुपर ओव्हरमध्ये दाेन्ही संघांनी प्रत्येकी १ चाैकार मारला.

बातम्या आणखी आहेत...