आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आयपीएलमध्ये आपले सोनेरी दिवस पाहण्यासाठी पुन्हा एकदा उत्सुक आहे. संघाचे नेतृत्व विश्वविजेता कर्णधार मॉर्गनकडे साेपवण्यात अाले. याच कुशल नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ विश्वविजेता ठरला. मॉर्गन सत्राच्या सुरुवातीपासून संघाचे नेतृत्व करेल. त्यामुळे फ्रँचायझीला प्रोत्साहन मिळेल. गतसत्रामध्ये दिनेश कार्तिकने चांगली कामगिरी करत असताना अर्ध्यातून संघाचे नेतृत्व सोडले होते. त्यानंतर मॉर्गनला कर्णधार बनवण्यात आले. तेव्हा मॉर्गन विशेष काही करू शकला नव्हता. कारण, अर्ध्यातून नेतृत्व मिळाल्याने त्याच्या योजनांवर काम करणे शक्य झाले नाही. यंदा मॉर्गन पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट मानसिकतेने उतरेल. कारण, तो सुरुवातीपासून संघाचा कर्णधाराच्या भुमिकेत असणार अाहे.
मजबूत देशी-विदेशी गोलंदाजी आक्रमक
संघ यंदा संतुलित दिसत आहे. संघाच्या यादीत अनेक युवा भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. केकेआरकडे इंग्लंडविरुद्ध मालिकेदरम्यान नुकताच पदार्पण करणारा प्रसिद्ध कृष्णासह कमलेश नागरकोटी, संदीप वाॅरियर व शिवम मावीसारखी वेगवान आक्रमण करणारी मजबूत फळी आहे. त्याचबरोबर पॅट कमिन्स व लॉक फर्ग्युसनसारखे विदेशी स्टार गोलंदाज आहेत. ते आक्रमक गोलंदाजीने फलंदाजांना धडकी भरवतात. शकिब अल हसन व हरभजनसिंग अंतिम ११ मध्ये नसले तरी त्याचा अनुभव संघासाठी फायदेशीर ठरेल. त्यांचे मार्गदर्शनही युवा गाेलंदाजांच्या फळीसाठी पाठबळासारखे ठरेल. त्यामुळे काेलकात्याला समाधानकारक खेळी करता येईल.
आंद्रे रसेलच्या सहभागामुळे ऑलराउंडरचे फॅक्टर सरस
संघाची उर्वरित उणीव अष्टपैलू आंद्रे रसेल भरून काढेल. तो मोठे फटके खेळतो, वेगवान गोलंदाजी करतो आणि क्षेत्ररक्षणही जबरदस्त आहे. मॉर्गन असे प्रकरणे सांभाळण्यात माहिर आहे. रसेलचा पर्याय म्हणून ऑस्ट्रेलियाचा बेन कटिंग संघात आहे. सुनील नरेन सलामी फलंदाजी करू शकतो व नाहीसुद्धा. संदिग्ध गोलंदाजी शैलीन; अडकल्यामुळे त्याच्या कामगिरी घसरण झाली आहे. त्यामुळे त्याला आता स्वत:ला सिद्ध करावे लागणार अाहे.
रसेल ठरलाय सिक्सर किंग; प्रत्येक सहाव्या चेंडूवर षटकार
चेंडू /षटकार फलंदाज (टीम) 6.45 आंद्रे रसेल (कोलकाता) 9.11 हार्दिक पंड्या (मुंबई) 9.11 क्रिस गेल (पंजाब) 10.19 किरोन पोलार्ड (मुंबई) 10.44 सुनील नरेन (कोलकाता) (या सर्वांनी आयपीएलमध्ये ५०० वा त्यापेक्षा अधिक चेंडूंचा सामना केला.
फिरकीचे जाळे मजबूत करण्याचे टीमसमोर आव्हान
काेलकाता संघामध्ये भारतीय फलंदाजी कमजोर दिसते. मात्र, या टीमकडे आघाडीच्या फळीत युवा खेळाडू शुभमन गिल व राहुल त्रिपाठी आहे. शेल्डन जॅक्सन व करुण नायर राखीव आहेत. जखमी रिंकू सिंगच्या जागी अखेरच्या वेळी गुरकिरतसिंग मान अचूक अष्टपैलू सिद्ध होऊ शकतो. मात्र, सर्वात मोठी अडचण फिरकीपटूंची आहे. वरुण चक्रवर्ती व कुलदीप यादव दोन पहिल्या पसंतीचे फिरकीपटू आहेत. मॉर्गन त्यांचा वापर कसा करतो ते पाहावे लागेल. त्यासाठी त्याला अधिक मजबूत असे डावपेच अाखण्याची संधी अाहे. ही फळी त्याचे नेतृत्व यशस्वी करू शकेल. द भारतीय थिंकटँकच्या मते, चक्रवर्ती पूर्णपणे तंदुरुस्त नाही. दुसरीकडे, कुलदीप लयीत नाही, तो संघर्ष करतोय. या संघात क्षमता दिसून येते. कारण, त्यांच्याकडे किताब जिंकण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी आहेत. म्हणजे, केकेआरकडे असे खेळाडू आहेत, जे संघाला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनवू शकतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.