आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2021:ऋषभच्या दिल्लीकडून धाेनीचे सुपरकिंग्ज पराभूत, पृथ्वी शाॅ-धवनची दिल्लीकडून 138 धावांच्या भागीदारीची सलामी

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलामीवीर पृथ्वी शाॅ (७२) आणि सामनावीर शिखर धवनच्या (८५) तुफानी खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने शनिवारी १४ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये शानदार विजयी सलामी दिली. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने लीगच्या आपल्या पहिल्या सामन्यात धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज टीमला पराभूत केले. दिल्ली टीमने वानखेडे स्टेडियमवर ७ गड्यांनी सामना जिंकला. यासह दिल्लीने लीगमध्ये दणदणीत विजयाने आपले खाते उघडले.

धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १८८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघाने १८.४ षटकांत तीन गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून आणली. संघाच्या विजयासाठी सलामीच्या पृथ्वी आणि शिखर धवनची आतषबाजी महत्त्वाची ठरली. या दाेघांनी संघाला १३८ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. यादरम्यान दाेघांनी शानदार वैयक्तिक अर्धशतकांची नाेंद केली. चेन्नई टीमकडून शार्दूल ठाकूरने दाेन आणि डॅ्वेन ब्राव्हाेने एक बळी घेतला.

दुसऱ्या सामन्यात तीन अर्धशतके साजरी
युवा फलंदाजांच्या तुफानी फटकेबाजीने आयपीएलचा दुसरा सामना अधिक रंगतदार ठरला. या सामन्यात तीन अर्धशतकांची नाेंद झाली. यामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज टीमच्या अनुभवी फलंदाज सुरेश रैनासह (५४) आणि दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शाॅ (७२) आणि शिखर धवनच्या (८५) अर्धशतकांचा समावेश आहे. सलामीच्या मुंबई-बंगळुरू सामन्यात अर्धशतक साजरे झाले नाही. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच सामन्यात तीन अर्धशतकांची नाेंद झाली. त्यामुळे हा सामना फलंदाजीमुळे लक्षवेधी ठरला. शिखर धवनने ५४ चेंडूंत ८५ धावांची खेळी केली.

वर्षभरानंतर कर्णधार धाेनीचा फ्लाॅप शाे; दाेन चेंडू खेळून शून्यावर बाद
चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धाेनी लीगच्या पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. वर्षभरापासून मैदानाबाहेर असलेल्या धाेनीचा सामन्यात फ्लाॅप शाे झाला. त्याला शनिवारी दिल्लीविरुद्ध दाेन चेंडूंचा सामना खेळताना भाेपळाही फाेडता आला नाही. ताे शून्यावर बाद झाला. त्यामुळे त्याचा माेठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला. त्याला दिल्लीचा युवा गाेलंदाज आवेश खानने बाेल्ड केले. त्यामुळे धाेनी आल्यापावली माघारी परतला.

पृथ्वी शाॅ-धवनची दिल्लीकडून १३८ धावांच्या भागीदारीची सलामी
दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शाॅने यंदाच्या सत्रातील आपला पहिला आयपीएल सामना गाजवला. त्याने पहिल्याच सामन्यात आपला सहकारी व अनुभवी फलंदाज शिखर धवनसाेबत शतकी भागीदारीची सलामी दिली. या दाेघांनी पहिल्या गड्यासाठी १३८ धावांची भागीदारी रचली. पृथ्वी शाॅने ३८ चेंडूंमध्ये नऊ चाैकार व तीन षटकारांसह ७२ धावांची खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...