आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज IPL मॅच नाही:दोन खेळाडूंना कोरोना झाल्याने आजचा KKR विरुद्ध RCB चा सामना पुढे ढकलला; ट्रॅव्हेल पॉलिसी आणि हॉटेलमुळे झाला कोरोना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन क्रिकइन्फोने सामना पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलवर देखील परिणाम केला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चे दोन खेळाडू संक्रमित असल्याचे आढळले आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध केकेआरचा सामना आज पुढे ढकलण्यात आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना होणार होता. क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन क्रिकइन्फोने सामना पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे.

ट्रॅव्हल्स पॉलिसीतील त्रुटी आणि मुंबईतील हॉटेलमधील बायो-बबलमुळे खेळाडूंना संसर्ग झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की केकेआरचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर्स संक्रमित झाले आहेत. आयपीएलच्या नियमांनुसार या दोन्ही खेळाडूंना बायो-बबलमध्ये स्थान देण्यात आले होते. संक्रमणाच्या वृत्तामुळे बंगळुरू टीममध्येही चिंता होती आणि ते मॅच खेळण्याविषयी जास्त उत्सुक दिसत नव्हते.

बायो-बबलमध्ये खेळाडू संक्रमित कसे?
सूत्रांनुसार, केकेआरने आययपीएल सुरू होण्यापूर्वी मार्चच्या अखेरच्या आठवड्यात आपल्या खेळाडूचा मुंबईमध्ये कँप केला. येथे एका हॉटेलमध्ये बायो-बबल तयार करण्यात आला होता. यानंतर टीम एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात चेन्नईत पोहोचली. आता चैन्नईमध्ये बायो-बबल तयार करण्यात आला. येथे कोलकाताने तीन मॅच खेळल्या. 18 एप्रिलला चेन्नईमध्ये अखेरची मॅच खेलल्यानंतर टीम पुन्हा मुंबईत परत आली.

मुंबईत बायो-बबल संपुष्टात आला होता. अशा परिस्थितीत पुन्हा बायो-बबल तयार करण्यात दुर्लक्ष करण्यात आले. मुंबईत केकेआर ज्या हॉटेलमध्ये पुन्हा थांबली, त्या दरम्यान त्यांची देखरेख करण्यासाठी ठेवलेले कर्मचारी कोरोना संक्रमित आढळले.

कोलकाताला एका आठवड्याच्या आत दोनदा प्रवास करावा लागला. टीमने मुंबईमध्ये पहिला सामना 21 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ससोबत आणि दुसरा सामना 24 एप्रिलला राजस्थान रॉयल्ससोबत खेळला. यानंतर टीम अहमदाबादसाठी रवाना झाली. सूत्रांनुसार, असे असू शकते की, या दरम्यान खेळाडू संक्रमित झाले असतील.

बातम्या आणखी आहेत...